पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेलास समुद्रकिनारा, रत्‍नागिरी - Velas Beach, Ratnagiri

     ऑलिव्ह रिडली जातीच्या कासवांसाठी प्रसिध्द असलेले अंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील वेलास हे गाव आणि ह्या गावचा वेलास समुद्रकिनारा.       पूर्वेला डोंगराने वेढलेला आणि पश्चिमेला अथांग असा निळाशार समुद्र अशा निसर्गसौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा म्हणजे वेलास. वेलास गावचा इतिहास म्हणजे नाना फडणवीस यांचे हे जन्मगाव. एवढीच माहिती अनेकांना वेलास गावाबद्दल माहित असावी त्यामुळे दुर्लक्षीत असलेले हे गाव. पण हे गाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे ते ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या कासवांमुळे. या ऑलिव्ह रिडली प्रजातीची कासवे त्यांच्या विणीच्या (प्रजनन काळ) हंगामात या वेलासच्या सुरक्षित समुद्रकिनारी त्यांची असंख्य अंडी देतात व मार्च अखेरपर्यंत त्या अंड्‍यातून निघणारी पिल्ले त्याच्या मुक्‍कामी म्हणजे समुद्रात परतात.         गावातील मंडळी या कासवांच्या अंड्‍यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतात. तसेच गावातीलच सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे स्वयंसेवक सकाळपासूनच समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकांना कासवांबाबतीत योग्यते मार्गदर्शन करतात. येथे कासवांची अंडी नैस

रेड कार्पेट मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय - Red Carpet Wax Museum

     आज आपण मुंबईतील पहिले मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय जे घाटकोपर मधील आर. सिटी मॉल मध्ये वसलेले आहे त्यासंबंधी माहिती घेऊयात.       हे संग्रहालय जवळपास १००० चौरस फुट क्षेत्रात पसरलेले आहे. ते बनवताना साधारण ५ वर्षांचा अवधी लागला कारण त्यांना तिथे फक्‍त पुतळेच ठेवायचे नव्हते तर त्या पुतळ्यांबरोबरच त्या व्यक्‍तिमत्वाचा अभ्यास करुन त्या व्यक्‍तींनी केलेल्या कार्यांचा त्या पुतळ्यांभोवती वातावरण निर्मिती करायची होती म्हणून एकढा अवधी हे संग्रहालय बनवण्यास लागला. हे संग्रहालय डिसेंबर २०१६ साली सर्वांसाठी खुले केले.      येथे जगातील सर्वोत्कृष्ट असे समाजसेवक, राजकारणी, सिनेसृष्टीतील सिने तारे - तारका, क्रीडापटू, वैज्ञानिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचे मेणाचे पुतळे येथे आहेत, त्यात दलाई लामा, नेल्सन मंडेला, मायकल जॅक्शन, बराक ओबामा, मदर तेरेसा, अब्राहिम लिन्कन, अण्णा हजारे, सायना नेहवाल, मेसी अजून असे जवळपास ४० व्यक्‍तींचे मेणाचे पुतळे आहेत, त्यांच्याबद्‍दलची माहितीही येथे तुम्हाला दिली जाते. त्याशिवाय तुम्ही इथे पुतळ्यांबरोबर फोटो देखील काढू शकता. हे बघताना वेळ कसा जातो ते कळतसुद्‍धा नाही

गिल्बर्ट टेकडी (हिल) - Gilbert Hill

      आज आपण मुंबईस्थीत एका दुर्लक्षित जागतिक वारसाबद्दल माहिती घेऊयात.      मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेली ही जागतिक वारसा लाभलेली वास्तु म्हणजे गिल्बर्ट टेकडी (हिल). सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मेझोझिक कालखंडात पृथ्वीच्या गर्भातून झालेल्या ज्वालामुखीच्या लावारसातून त्याकाळी ५६ एकर पसरलेली आणि २०० फुट उंच तयार झालेली स्तंभरुपी कडा असलेली टेकडी म्हणजेच गिल्बर्ड टेकडी (हिल). अशाप्रकारच्या स्तंभरुपी कडा असलेल्या आश्चर्यकारक आणि भौगोलिक दृष्ट्‍या दुर्मिळ असलेल्या टेकड्‍या किंवा डोंगर हे जगात फक्‍त तीनच ठिकाणी आहेत त्यातली एक आपल्या भारतातील महाराष्ट्रात असलेल्या मुंबईतील अंधेरी  पश्चिम  येथील गिल्बर्ट टेकडी (हिल). दुसरे अशाच पद्धतीने तयार झालेल्यांपैकी एक आहे वायोमिंगमधील डेविल्‍स टॉवर आणि दुसरे पूर्व कॅलिफोर्निया अमेरिका येथील डेव्हिल्स पोस्टपाईल अशी ही अद्‍भुत निसर्गाचा अविस्कार असलेली ठिकाणे आहेत.      गिल्बर्ट टेकडी ही सुरुवातीस ५६ एकर परिसात पसरलेली ही टेकडी  सद्‍ध्या काही  लोकांनी अजानतेपणे केलेल्या खोदकामामुळे काही एकर येवढीच टेकडी उरलेली आहे. या टेकडीचे काही अवशेष जोगेश्वरी

महाराष्ट्र निसर्ग उद्यान - Maharashtra Nature Park

          महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे मुंबईच्या मध्यभागी असलेले मानव निर्मित जंगल आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाला पूर्वी माहिम निसर्ग उद्यान म्हणूनही ओळखले जात असे. या ठिकाणी पूर्वी म्हणजे ऐंशी - नवदीच्या दशकात येथे मोठे कचरा संचयनाचे आणि त्याची योग्यती व्यवस्था करण्याचे ( Garbage Dumping Ground)  ठिकाण होते. अथक प्रयत्‍नाने धारावी या ठिकाणी मिठी नदीच्या खारफुटीच्या जंगलाला लागूनच हे महाराष्ट्र निसर्ग उद्यान वसवलेले आहे.        जेष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या उपस्थितीत आंबा, पिंपळ, वड, उंबर आणि पळस ह्या स्थानिक पाच झाडांचे महाराष्ट्र निसर्ग उद्यानात वृक्षारोपण केले. मार्च १९९१ साली महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल आणि वनविभागाने महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि या उद्यानाला लागूनच असलेल्या मिठी नदीतील खारफुटीचे जंगल मिळून बनलेल्या जवळजवळ १८० हेक्टर क्षेत्राला "संरक्षित वन" म्हणून घोषित केले.       सुरुवातीला येथे पहिला फक्‍त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांनाच प्रवेश होता, कालांतराने मग सामान्य जनमाणसांत निसर्गाप्रती जनजागृती व्हावी या कारणास्तव काही माफक दरात प्रवेश शुल्क

थिबा राजवाडा - Thiba Palace

     इ. स. १८८५ सालापासून रत्‍नागिरी आणि ब्रम्हदेश म्हणजे सद्ध्याचा म्यानमार देशाबरोबर भावनिक नाते जुळलेले आहे ते थिबा राजामुळे.      १८८५ साली ब्रिटिशांनी ब्रम्हदेशावर कब्जा करत सात वर्षे राज्य करणार्‍या थिबा राजा आणि परिवाराला बंदी केले. ब्रम्हदेशावर राज्य करणारा शेवटचा राजा म्हणजेच राजा थिबा. राजाने पुन्हा उठाव करु नये म्हणून बंदी केलेल्या राज परिवाराला तत्कालिन मद्रास मार्गे रत्‍नागिरीला आणले व येथे स्थानबध्द केले. पण राज परिवाराला जेथे उतरवण्यात आले होते तेथे राज परिवाराला साजेशा सुविधा पुरविता येत नव्हत्या म्हणून १९१० साली सुमारे २७ एकराच्या प्रशस्थ जागेवर सर्व सोयींनी सुसज्‍ज असा तीन मजली राजवाडा बांधला. आणि थिबा राजाच्या राजपरिवाराला मग या राजवाड्‍यात नजरकैद करून ठेवले. थिबा राजाचा आपल्या मायभूमी, प्रजेपासून दूर जवळ जवळ ३० वर्षाच्या नजरकैदेत वयाच्या ५८ व्या वर्षी १९१९ साली मृत्यू झाला. अशा या राजाच्या या राजवाड्‍यातील वास्तव्यामूळे हा राजवाडा "थिबा राजवाडा" म्हणून प्रसिध्द झाला.        राजाला वेगवेगळ्या कलांचे शौक असल्यामुळे राजवाड्‍यात तळ मजल्यावर संगमरवरी नृत्यगृह उ

चौल रेवदंडा - Chaul Revdanda

     आज आपण पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्याविषयी माहिती घेऊया. तर कुंडलिका नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम होतो असे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालूक्यातील रेवदंडा गाव. या रेवदंडा गावातून जंजिर्‍याच्या सिद्धीच्या आणि मुंबईकर इंग्रजाच्या सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगिज कॅप्टन सोज याने १५२८ साली किल्ला बांधावयास सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी १५२१ ते १५२४ सालादरम्यान रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून घेतली. या रेवदंडा गडावर तीन राज्यकर्त्यांनी राज्य केले एक अर्थातच पोर्तुगिज दुसरे मराठे आणि तिसरे इंग्रज. तर हा झाला रेवदंडा किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास.        किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच पोर्तुगिजांचे राजचिन्ह कोरलेले दिसते. हा किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडे असला तरी काही ठिकाणी किल्ल्यावर खाजगी मालकी हक्‍क असल्याचे समजून येते त्यामुळे संपूर्ण किल्ला पहावयास मिळत नाही. किल्ला आणि भोवतालची तटबंदी बर्‍याच ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत आहेत.        किल्ला पाहून झाल्यानंतर पश्चिमेस असलेला नितांत सुंदर नारळी पोफळीच्या झाडांनी बहरलेल्या अशा निवांत समुदकिनार्‍याला भेट द

अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा - Alibag Geo-magnetic Observatory

     आपल्या भारत देशातले हवामान जसे आहे तसे इतर देशांमध्ये क्वचितच  बघायला  आणि अनुभवायला मिळतील. आपल्या देशात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आढळतात. इतर देशांमध्ये शक्यतो हिवाळा आणि उन्हाळा हेच ऋतू आढळातात आणि क्वचितच पाऊस पडतो. आपल्या भारत देशातील शेती प्रामुख्याने पावसावर आणि लहरी हवामानावर खूप अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अभ्यास असणे खूप आवश्यक होते. सतरा अठराव्या शतकाच्या दरम्यान पार्‍याच्या तापमापक (थर्मामीटर/ Thermometer)  आणि वायुभारमापक (बरोमीटर/ Barometer)  यांचा शोध लागला होता. या दोन यंत्रांमुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याची शक्यता खूप वाढली होती म्हणून ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने या तंत्रज्ञानाचा वापर करुन हवामानाचा आधुनिक अभ्यास करण्यासाठी १८२३ साली मुंबईच्या कुलाबा येथे वेधशाळा उभारली व ती पुढे कुलाबा वेधशाळा म्हणून ओळखू लागली. येथे सुरुवातीला हवामान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करत त्यांच्या नोदी करत असत. १८४० साली येथे चुंबकाकर्षकमापन ( Magneto Meter)  यंत्रे बसविण्यात आली. तेव्हापासून येथे पृथ्वीवरील चुंबकीय लहरींचा देखील अभ्यासास सुरुवात झाली आणि य

सांधण दरी - Sandhan Valley

इमेज
     सह्याद्री पर्वत रांगेतील, अहमद नगर जिल्ह्यातील सामरद गावातील एक ठिकाण असे आहे जेथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटक, गिर्यारोहक, प्रस्तरारोहक येण्यासाठी आणि तिथला अनुभव घेण्यासाठी खुप आतूर असतात, अशी  निसर्गाचा  चमत्कार  असलेली  व आशिया  खंडातील  लांबीच्या  बाबतीत  दुसर्‍या  क्रमांकावर  असलेली  ‘सांधण दरी’ . आज आपण या सांधन दरी बद्दल माहिती घेऊ.        अहमद नगर जिल्यातील अकोला तालुक्यातील सामरद या गावातून साधारण दीड ते दोन कि.मी. नागमोडी वळणदार वाटेने सांधण दरीजवळ पोचतो. मग सुरु होतो तो अविस्मरणीय, रोमांचीत करणारा खरा प्रवास.   *** वरील छायाचित्र हे गुगल मॅप द्वारे घेतलेले आहे, तरीही अगदी स्पष्ट दिसत आहे यावरुनच सांधन दरीची भव्यता दिसून येते.      सांधण दरीच्या सुरुवातीलाच समोर दिसणार्‍या नजार्‍याने या नैसर्गिक अ द् भुत चमत्काराची, भव्यतेची जाणीव होते. सांधण दरी साधारण चारशे फुट खोल आणि सुमारे २ कि.मी. लांब आहे. दरीचा प्रवास एकदम खडतर असा खडकाळ आहे. थेडे पुढे गेल्यावर दोन पाण्याचे पडाव लागतात त्यातील पहिला पडावात पाणी दोन ते चार फुट खोल तर दुसर्‍या पडावात साधारण ४ ते ६ फुट खोल पाणी

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य - Bhimashankar Wildlife Sanctuary

     भीमाशंकर म्हटले की पहिली ओळख येते ती म्हणजे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक, स्वंभू शिवलिंग असलेले शिवशंकराचे मंदिर. भीमाशंकर हे सह्याद्रीच्या कुशीत, आणि पुण्यातील खेड तालुक्यात वसलेले एक तिर्थक्षेत्र तसेच थंड हवेचे ठिकाण. येथे नेहमी भाविक, निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, पशू पक्षीनिरिक्षक, वनौषधींचे अभ्यासक यांचा राबता असतो.        येथे येणारे सर्वजण या हेमांडपंथी बांधकाम, नक्षीकाम असलेले भीमाशंकर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहूनच प्रसन्न होतात. या मंदिरात चांदीचे शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरील आवारात दोन मोठे दगडी नंदी, तसेच वसईच्या युध्दात पेशव्यांनी जिंकलेली एक विशाल घंटा ठेवलेली पहावयास मिळते. भीमाशंकर मंदिरात श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते, त्यावेळी लाखो भाविक मोठ्या श्रध्देने मंदिराला भेट देतात.        मंदिराच्या पुर्व दिशेने थोडे खाली उतरले की जंगलाची सुरुवात होते. भीमाशंकरचे जंगल ठाणे, रायगड, पुणे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये साधारण १२०-१२५ चौरस कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे. हे जंगल उंचच उंच झाडींनी वेढलेले आहे, त्यामुळे जंगलात सहसा सूर्यप्रकाश जमिनीवर पोचतसुध्दा नाहीत

जव्हार - Jawhar

     जव्हार हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेले नयनरम्य ठिकाण. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण इथल्या वारली चित्रकलेसाठीही प्रसिध्द आहे.  या जव्हार संस्थनाची स्थापना १३४३ साली राजा जयाबा मुकाणे यांनी केली. राजा पतंग शाह (चौथा) आणि त्याच्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी जव्हारच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले. जव्हारचे राजा पतंग शाह (पाचवे) हे जव्हार संस्थानाचे शेवटचे राज्यकर्ते ठरले. ह्या संस्थानाने १९४७ मध्ये भारतात विलिन होईपर्यंत मागील सहाशे वर्षे बरीच स्थित्यांतरे पहिलीत.        येथील प्रेक्षणिय स्थळे :      जयविलास पॅलेस (राजवाडा)     जव्हारमधील एक मुख्य आकर्षण असलेला पाश्चात्य आणि भारतीय शैलीचा मिलाप असलेला राजा यशवंत मुकणे यांनी बांधलेला राजवाडा म्हणजेच जयविलास पॅलेस (राजवाडा). या वाड्यामधील आंतर्गत सजावट ही मुकणे परिवारातील आदिवासी राजांची समृध्द संस्कृती आणि जिवनशैलीचे दर्शन घडविते.      हनुमान पॉइंट      जव्हार शहराच्या मध्यभागापासून साधारण १ ते २ कि.मी. अंतरावर असलेले एक जुने मारुतीचे मंदिर आहे, ते कात्या मारुती मंदिर म्हणूनही प्रसिध्द आहे.

फणसाड वन्यजीव अभयारण्य - Fansad Wildlife Sanctuary

     महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यातील १७,२५० एकर जागेवर जंगल, गवत आणि दलदल यांनी व्यापलेला भूभाग म्हणजेच फणसाडचे जंगल. फणसाडचे जंगल रोहा येथून मुरुडकडे जाणार्‍या वाटेवर काशिद समुद्र किनार्‍यापासून कुंडलिका नदीदरम्या न  पसरलेले आहे. स्वातंत्रापूर्वी शिकारीसाठी मुरुड जंजिर्‍याच्या सिध्दी नवाब यांच्या राज्यकर्त्यांसाठी हे जंगल राखीव होते. भारत स्वातंत्र्यानंतर वनविभागाकडे या जंगलाची जबाबदारी आली आणि १९८६ साली तत्कालीन सरकारने या जंगलातील जैवविविधता जोपासण्यासाठी फणसाड जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला.      या  अभयारण्यात  सदाहरित, निमसदाहरित, पानझडी, शुष्क पानझडी प्रकारातली झाडे आहेत. येथे आयन, आंबा, सागवान, अंजन, जांबा, जांबुळ व अनेक औषधी झाडे अशा एकून ७१८ प्रजातीच्या वनस्पती, झुडपे तसेच विविध प्रकारची फुलझाडे आढळतात.      या  अभयारण्यात  बिबट्या, हरण, सांभर, रान डुक्कर, भारतीय राक्षसी खारुताई  (Ratufa indica),  भेकर, तरस यांसारख्या प्राण्यांच्या १७ प्रजाती याचबरोबर शिक्रा, हॉक गरुड, क्रेस्टेड सर्प गरुड, केस्ट्रल, हरियाल (हिरवे कबूतर), असे एकूण पक्ष्यांच्या १६४ प

उत्तन समुद्र किनारा आणि माता वेलंकणी चर्च - Uttan Beach & Mother Velankanni Church

     महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर महानगर पलिकेच्या हद्दीत असणारे आणि मुंबईच्या उत्तर समुद्री किनार्‍यावर वसलेले उत्तन हे गाव. उत्तनला शांत आणि विरळ असलेली वस्ती व त्यांच्या घरांची ठेवण बघून लोक मिनी गोवा सुद्धा म्हणतात.      उत्तनला लाभलेला सुंदर असा समुद्री किनारा म्हणून इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी असल्यामुळे येथील शनिवार आणि रविवारी भरणारा मासळी बाजार ताज्या माश्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून बहूतेक मुंबईकर शनिवार, रविवारच्या सुट्टीचा आनंद आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी उत्तनला जरुर भेट देतात.      उत्तनचा सागरी किनारा हा नारळ, फोफळीच्या झाडांनी बहरलेला आहे. तसा हा दुरलक्षित सागरी किनारा असल्यामुळे इथे निवांत समुद्र किनारी फेरफटका मारत, मजामस्ती करत सहज दिवस निघून जातो.      येथे जास्तकरुन ख्रिच्छन कोळी समाज असल्यामुळे भाटे बंदरात असलेले माता वेलंकणी चर्च प्रसिद्ध आहे. मुख्यकरून येथे २९ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर या कालावधील वार्षिक जत्रा भरते, त्यावेळी या माता वेलंकणी चर्चला देश परदेशातून लाखो भाविक भेट देतात. अथांग समुद्राच्या पार्श्वभूमीवर मातेची मूर्ती

दुरशेत - Durshet

     मुंबई आणि पुणे दरम्यान सह्याद्रीच्या कुशीत आणि अंबा नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य असे एक छोटे गाव आहे. दुरशेतचा परिसर सभोवताली डोंगराळ प्रदेश आणि पठाराने व्यापलेला आहे. मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे निवांत वेळ घालवण्यासाठी बरीच लोकं या ठिकाणी भेट देतात.      दुरशेत हे ठिकाण येथील अप्रतिम सौंदर्याने नटलेले, पावसाळ्यात सगळीकडे दिसणारी हिरवळ, धबधब्यातून वाट काढत टेकट्यांकडे जाणार्‍या पायवाटा अशा या नाना विविध सौंदर्याने नटलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये खुप प्रसिध्द आहे.      गिर्यारोहकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. दुरशेत हे अंबा नदीच्या किनारी असल्यामुळे येथे वन्यजीव तसेच मुबलक प्रमाणात वन्य संपदा येथे आढळते.  हल्ली येथे पर्यटकांनची होणारी गर्दी पाहून येथे जलक्रिडांचे  (Water Sports)  आणि साहसी खेळांचे आकर्षण केंद्र बनले आहे. यात उत्साह, साहस आणि रोमांच भरणार्‍या अनेक खेळांचा समावेश आहे, जसे की रॅपलींग, वॉल-क्लाइंबिंग, टार्झन स्विंग इत्यादी.        दुरशेत हे महाड येथील श्री वरदविनायक गणपती आणि पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती या दरम्यान वसलेले आहे म्हणून जर वेळ अस

किल्ले कर्नाळा आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य - Karnala Fort & Karnala Bird Sanctuary

     मुंबईकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात मनाला आनंद आणि खुप सोयीचे असलेले ठिकाण म्हणजे कर्नाळा. भल्या पहाटे निघाले तर एका दिवसाच्या भटकंतीत गिर्यारोहण (ट्रेकींग) आणि पक्षी निरिक्षणाचा आनंद घेता येतो.        जरा आपण या किल्ल्याच्या इतिहासात डोकावून बघूयात.      कर्नाळा हा किल्ला रायगड जिल्यातील पनवेल तालुक्यातील आहे. प्राचीन कालखंडापासून म्हणजे यादव (इ. स. ८५० ते इ. स. १३३४) काळापासून व्यापारावरील दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला प्रसिध्द होता असा उल्लेख आढळतो.        तर असा हा किल्ला छत्रपती शिवाजी महारांनी इ. स. १६५६ साली हा किल्ला स्वराज्यात आणला. नंतर पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेला, परत १६७० साली परत स्वराज्यात आणला असा हा कर्नाळा किल्ल्याचा इतिहास आहे.        ह्या किल्लावर एक सुळका आहे, तो अंगठ्या सारखा दिसतो म्हणून हल्ली  Thumb Point  म्हणूनही प्रसिध्द आहे. जस जसे आपण किल्ल्याच्या दिशेने प्रवास करत किल्ल्याजवळ येतो, तस तसा हा सुळका आपल्याला खुणावत राहतो. ह्या किल्ल्यावर येताना पायथ्यालाच महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे तेथेच आपल्याला उतरुन किल्ल्याच्या दिशेने कुच करावी ल

भंडारदरा - Bhandardara

     ज्यांना मुंबई जवळचे थंड हवेचे ठिकाणी फिरायला जायचे असेल, त्यांच्यासाठी अहमदनगरमधील भंडारदरा एक उत्तम पर्याय आहे.        जर तुम्ही स्वत:ची गाडी घेऊन जात असाल तर उत्तमच कारण तुम्ही एकदा मुंबई नाशिक मार्गाला लागला की सुंदर अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा, नागमोडी वळणाचे रस्ते, पक्षांचा किलबिलाट, रस्त्याच्या कठड्यावर बसलेली माकडं आणि नुकताच जाणवू लागलेल्या थंड वार्‍याचा आनंद घेत, कधी भंडारदराला पोहोचलात ते कळणारसुध्दा नाही.        भंडारदरा हे प्रवरा नदीकाठी वसलेले एक गाव आहे. इथले प्रमुख आकर्षण म्हणजे ब्रिटिशांनी १९२६ साली बांधलेले आशिया खंडातील सर्वात जूने  आर्थर लेक विल्सन डॅम  म्हणजेच आत्ताचे  भंडारदरा धरण . येथे लोक मुख्यत: सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्यावेळी भेट देतात, कारण यावेळी धरणाचे अनोखे रुप यावेळी दिसते व आपल्याला तेथे छायाचित्रण  (फोटो काढण्याचा) करण्याचा मोह आवरता येत नाही . येथून जवळपास ११ कि. मी. अंतरावर रंधा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. येथे पावसाळ्यात असंख्य धबधबे पहायला मिळतात.        सर्वात महत्वाच

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

     मुंबईसारख्या काँक्रिच्या जंगलात वसलेले एक खरेखुरे जंगल असलेला भाग. शिवाय येथे आपल्याला वन्य प्राणी देखील मुक्तपणे विहार करताना बघायला मिळतील.        येथे जाळीदार बसमध्ये बसून आपण वन्य जीवन जवळून प्रत्यक्ष पाहायला मिळते. तसेच येथे मिनी ट्रेनची (वन राणी) सफरही आनंद देऊन जाते. नॅशनल पार्कमध्ये सुरुवातीस दिसणार्‍या तलावात नौकाविहार करता येते.        अजून येथील जंगलात बघण्यासारखे बरेच आहे. जसे की तीन मुर्ती, गांधी टेकडी, कान्हेरी गुंफा इत्यादी...   कसे जायचे :  बोरीवली पूर्व रेल्वे स्थानकावरुन बस किंवा रिक्षा करून पाच मिनिटांमध्ये पोचू शकता.   कधी जायचे :  वर्षाचे बारा महिने कधीही   राज्य :  महाराष्ट्र   जिल्हा :  मुंबई

वज्रेश्वरी - Vajreshvari

      गिर्यारोहण (ट्रेकिंग) किंवा भटकंती त्याचबरोबर देवदर्शन करणार्‍यांसाठी वज्रेश्वरी एक उत्‍तम ठिकाण आहे.      येथे जातानाच मन प्रसन्‍न होऊन जाते कारण येथील वाटच मुळात नदीतून जाते, त्यामुळे नदीच्या पाण्यात मस्ती करत, आजूबाजूचा निसर्ग बघत कधी वज्रेश्वरीला पोचणार ते कळणारसुद्धा नाही. हा परिसर घनदाट वनराईने वेढलेला असल्यामुळे येथे थंडगार आणि आल्हाददायी हवा, अशा सुंदर शांततेत पक्षांचा सुमधूर किलबिलाट यामुळे वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होतो.      येथे खासकरुन लोक गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी आणि कुंडाजवळच वज्रेश्वरी मातेचे मंदिर आहे ज्यात तीन देवीच्या मुर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्‍या संखेने येतात.   कसे जायचे :  बोरीवली, ठाणे, वसई, विरार, कल्याण, भिवंडी येथून एसटीने वज्रेश्वरीला जाऊ शकतो. कधी जायचे :  वर्षाचे बारा महिने कधीही राज्य  :  महाराष्ट्र जिल्हा :  ठाणे

गोराई बीच - Gorai Beach

      मुंबईच्या गोंगाटापासून दूर जायचे आहे, समुद्रात डुंबायचेपण आहे आणि जास्त लांब जायचे नाही. तर मग गोराई बीच आहे की हाकेच्या अंतरावर.       मस्त नारळाच्या झाडांनी वेढलेला, लडीवाळपणे उसळणार्‍या लाटा. रेशमी रेती आणि त्यात मस्त बीच क्रिकेट, वॉलीबॉल खेळण्यात कसा वेळ जाईल ते कळणार सुद्धा नाही.       त्याशिवाय तेथे घोडे आणि उंट यांची सवारी सुद्धा करता येईल, आणि पेटपूजेसाठी तेथे किनार्‍यावर चाट, नारळपाणी, कुल्फी, थंडा यांचे विक्रेतेही आहेतच, पण घरचे खाण्याचे पदार्थ नेणे कधीही चांगलेच नाही का? मग कधी भेट देता गोराई बीचला   जवळील ठिकाणे :  एस्सेल वर्ल्ड, वॉटर किंगडम, गोल्डन पॅगोडा कसे जायचे :  पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्टेशनच्या पश्चिमेकडून बसने किंवा रिक्षाने गोराई जेटी पर्यंत जायचे, तेथून पुढे लॉंच ने पलिकडच्या किनारी उतरून पुन्हा रिक्षा किंवा टांगा करुन गोराई बीचला पोचाल, तसेच भाईंदर पश्चिम वरुन सुद्धा एस.टी. बस ने गोराईला जाता येते. कधी जायचे :  कधीही जाता येते. राज्य  :  महाराष्ट्र जिल्हा :  मुंबई

किल्ले रायगड Raigad Fort

इमेज
     किल्ले रायगड म्हणजे महाराष्ट्राचे एक पवित्र असे श्रद्धास्थान. स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, सहवासाने पावन झालेला, स्वराज्याची राजधानी असलेला, शिवराज्याभिषेक अनुभवलेला, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असा किल्ले रायगड.      किल्ले रायगडचे पूर्वीचे नाव रायरी असे होते. महाराजांनी १६५६ साली रायरीस वेढा घालून महिन्याभरात ताब्यात घेतला. आणि शत्रूला अवघड वाटणारा प्रदेश तसेच सागरी दळणवळण करण्यास सोयीचे असे ठिकाण म्हणून महाराजांनी रायरी किल्याची निवड केली व त्यास रायगड असे नामकरण केले.      किल्ल्याच्या पायथ्याजवळील पाचड गावात राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन रायगड किल्ल्याच्या दिशेने पावले टाकावी.     किल्ल्यावर बघण्यासारखे बसेच आहे. जसे महादरवाजा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, गंगासागराच्या दक्षिणेस असलेले दोन स्तंभ, कुशावर्त तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजसभा, नगारखाना, राजभवन, जगदीश्वाराचे मंदिर, बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी बुरूज, वाघ्या कुत्र्याची समाधी आणि ज्यासाठी एवढे कष्ट घेऊन जी तंगडतोड