फणसाड वन्यजीव अभयारण्य - Fansad Wildlife Sanctuary
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यातील १७,२५० एकर जागेवर जंगल, गवत आणि दलदल यांनी व्यापलेला भूभाग म्हणजेच फणसाडचे जंगल. फणसाडचे जंगल रोहा येथून मुरुडकडे जाणार्या वाटेवर काशिद समुद्र किनार्यापासून कुंडलिका नदीदरम्या न पसरलेले आहे. स्वातंत्रापूर्वी शिकारीसाठी मुरुड जंजिर्याच्या सिध्दी नवाब यांच्या राज्यकर्त्यांसाठी हे जंगल राखीव होते. भारत स्वातंत्र्यानंतर वनविभागाकडे या जंगलाची जबाबदारी आली आणि १९८६ साली तत्कालीन सरकारने या जंगलातील जैवविविधता जोपासण्यासाठी फणसाड जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला. या अभयारण्यात सदाहरित, निमसदाहरित, पानझडी, शुष्क पानझडी प्रकारातली झाडे आहेत. येथे आयन, आंबा, सागवान, अंजन, जांबा, जांबुळ व अनेक औषधी झाडे अशा एकून ७१८ प्रजातीच्या वनस्पती, झुडपे तसेच विविध प्रकारची फुलझाडे आढळतात. या अभयारण्यात बिबट्या, हरण, सांभर, रान डुक्कर, भारतीय राक्षसी खारुताई (Ratufa indica), भेकर, तरस यांसारख्या प्राण्यांच्या १७ प्रजाती याचबरोबर शिक्रा, हॉक गरुड, क...