रेड कार्पेट मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय - Red Carpet Wax Museum
आज आपण मुंबईतील पहिले मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय जे घाटकोपर मधील आर. सिटी मॉल मध्ये वसलेले आहे त्यासंबंधी माहिती घेऊयात. हे संग्रहालय जवळपास १००० चौरस फुट क्षेत्रात पसरलेले आहे. ते बनवताना साधारण ५ वर्षांचा अवधी लागला कारण त्यांना तिथे फक्त पुतळेच ठेवायचे नव्हते तर त्या पुतळ्यांबरोबरच त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करुन त्या व्यक्तींनी केलेल्या कार्यांचा त्या पुतळ्यांभोवती वातावरण निर्मिती करायची होती म्हणून एकढा अवधी हे संग्रहालय बनवण्यास लागला. हे संग्रहालय डिसेंबर २०१६ साली सर्वांसाठी खुले केले. येथे जगातील सर्वोत्कृष्ट असे समाजसेवक, राजकारणी, सिनेसृष्टीतील सिने तारे - तारका, क्रीडापटू, वैज्ञानिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचे मेणाचे पुतळे येथे आहेत, त्यात दलाई लामा, नेल्सन मंडेला, मायकल जॅक्शन, बराक ओबामा, मदर तेरेसा, अब्राहिम लिन्कन, अण्णा हजारे, सायना नेहवाल, मेसी अजून असे जवळपास ४० व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत, त्यांच्याबद्दलची माहितीही येथे तुम्हाला दिली जाते. त्याशिवाय तुम्ही इथे पुतळ्यांबरोबर फोटो देखील काढ...