पोस्ट्स

Raigad लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गांधारपाले लेणी, महाड - Gandharpale Caves, Mahad

   मुंबई गोवा मार्गावरील प्राचीन काळापासून एक महत्वाचे व्यापारी ठिकाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्यामुळे प्रसिद्ध असलेले महाड. महाड परिसरात येताच बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात लांबून दिसणारी लेणी आपल्याला खुणावत असते तीच गांधारपाले बौद्ध लेणी.       तर मग आज आपण या गांधारपाले बौद्ध लेण्याविषयी माहिती जाणून घेऊ या.       या परिसरातून गांधारी नदी वाहते, व लेण्याजवळ असलेल्या शिलालेखानुसार या प्रांतावर इ. स. १३० च्या दरम्यान बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांचे राज्य होते असे समजते, या पुलित राजाच्या नावावरूनच पुढे या गावाचे नाव पाले झाले असावे, कालांतराने गांधार नदी जवळील प्रदेश असल्यामुळे पाले हे गाव गांधारपाले या नावाने ओळखले जाऊ लागले. तर राजा विष्णु पुलित यांच्या कालखंडात ही तीन मजली बौद्ध लेणी २८-३० छोट्‍या मोठ्‍या लेण्यांच्या समुहात हीनयान पद्धतीने कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये ३ बौद्ध स्तुप, साधारण १५ पाण्याची टाकं आणि ब्राम्ही भाषेतील ३ शिलालेख आहेत.       त्यात...

चौल रेवदंडा - Chaul Revdanda

     आज आपण पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्याविषयी माहिती घेऊया. तर कुंडलिका नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम होतो असे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालूक्यातील रेवदंडा गाव. या रेवदंडा गावातून जंजिर्‍याच्या सिद्धीच्या आणि मुंबईकर इंग्रजाच्या सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगिज कॅप्टन सोज याने १५२८ साली किल्ला बांधावयास सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी १५२१ ते १५२४ सालादरम्यान रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून घेतली. या रेवदंडा गडावर तीन राज्यकर्त्यांनी राज्य केले एक अर्थातच पोर्तुगिज दुसरे मराठे आणि तिसरे इंग्रज. तर हा झाला रेवदंडा किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास.        किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच पोर्तुगिजांचे राजचिन्ह कोरलेले दिसते. हा किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडे असला तरी काही ठिकाणी किल्ल्यावर खाजगी मालकी हक्‍क असल्याचे समजून येते त्यामुळे संपूर्ण किल्ला पहावयास मिळत नाही. किल्ला आणि भोवतालची तटबंदी बर्‍याच ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत आहेत.        किल्ला पाहून झाल्यानंतर पश्चिमेस असलेला नितांत सुंदर नारळी पोफळीच...

अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा - Alibag Geo-magnetic Observatory

     आपल्या भारत देशातले हवामान जसे आहे तसे इतर देशांमध्ये क्वचितच  बघायला  आणि अनुभवायला मिळतील. आपल्या देशात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आढळतात. इतर देशांमध्ये शक्यतो हिवाळा आणि उन्हाळा हेच ऋतू आढळातात आणि क्वचितच पाऊस पडतो. आपल्या भारत देशातील शेती प्रामुख्याने पावसावर आणि लहरी हवामानावर खूप अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अभ्यास असणे खूप आवश्यक होते. सतरा अठराव्या शतकाच्या दरम्यान पार्‍याच्या तापमापक (थर्मामीटर/ Thermometer)  आणि वायुभारमापक (बरोमीटर/ Barometer)  यांचा शोध लागला होता. या दोन यंत्रांमुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याची शक्यता खूप वाढली होती म्हणून ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने या तंत्रज्ञानाचा वापर करुन हवामानाचा आधुनिक अभ्यास करण्यासाठी १८२३ साली मुंबईच्या कुलाबा येथे वेधशाळा उभारली व ती पुढे कुलाबा वेधशाळा म्हणून ओळखू लागली. येथे सुरुवातीला हवामान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करत त्यांच्या नोदी करत असत. १८४० साली येथे चुंबकाकर्षकमापन ( Magneto Meter)  यंत्रे बसविण्यात आली. तेव्हापासून येथे पृथ्वीवरील चुंबकीय लह...

फणसाड वन्यजीव अभयारण्य - Fansad Wildlife Sanctuary

     महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यातील १७,२५० एकर जागेवर जंगल, गवत आणि दलदल यांनी व्यापलेला भूभाग म्हणजेच फणसाडचे जंगल. फणसाडचे जंगल रोहा येथून मुरुडकडे जाणार्‍या वाटेवर काशिद समुद्र किनार्‍यापासून कुंडलिका नदीदरम्या न  पसरलेले आहे. स्वातंत्रापूर्वी शिकारीसाठी मुरुड जंजिर्‍याच्या सिध्दी नवाब यांच्या राज्यकर्त्यांसाठी हे जंगल राखीव होते. भारत स्वातंत्र्यानंतर वनविभागाकडे या जंगलाची जबाबदारी आली आणि १९८६ साली तत्कालीन सरकारने या जंगलातील जैवविविधता जोपासण्यासाठी फणसाड जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला.      या  अभयारण्यात  सदाहरित, निमसदाहरित, पानझडी, शुष्क पानझडी प्रकारातली झाडे आहेत. येथे आयन, आंबा, सागवान, अंजन, जांबा, जांबुळ व अनेक औषधी झाडे अशा एकून ७१८ प्रजातीच्या वनस्पती, झुडपे तसेच विविध प्रकारची फुलझाडे आढळतात.      या  अभयारण्यात  बिबट्या, हरण, सांभर, रान डुक्कर, भारतीय राक्षसी खारुताई  (Ratufa indica),  भेकर, तरस यांसारख्या प्राण्यांच्या १७ प्रजाती याचबरोबर शिक्रा, हॉक गरुड, क...