पोस्ट्स

Fort In Maharashtra लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सज्जनगड (सातारा) - Sajjangadh (Satara)

        सज्जनगड  म्हटले  की  सर्वप्रथम  डोळ्यासमोर  येतात  ते  समर्थ  रामदास  स्वामी.  कारणही  तसे  आहे  म्हणा, निजामाकडून मराठ्‍यांनी हा जिंकून घेतला व  शिवाजी  महाराजांनी   * (यावेळी  शिवाजी  महाराजांचा  राज्याभिषेक झाल्या  नसल्याकारणाने  येथे  शिवाजी  महाराज  असा  उल्लेख  केला  आहे.)  समर्थ  रामदास   स्वामींना   गडावर कायमच्या  वास्तव्यासाठी  विनंती  केल्यामुळे  ते  कायमचे  वास्तव्यास  आले  व  या  गडाचे  नाव  नौरससातारा  चे सज्जनगड असे झाले ते आजता गायत.        तर हा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडाची आज आपण माहिती घेणार आहोत.       सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्‍यातील कारी, परळी, गजवाडी या गावांनी वेढलेला आहे. ...

शिवनेरी किल्ला - Shivneri Fort

     आज आपण जगप्रसिद्ध अशा शिवनेरी किल्ल्याबद्दल महिती घेणार आहोत. कारणही आज तसेच आहे ना आज दिनांक १९ फेब्रुवारी, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि शिवनेरी किल्ला हे त्यांचे जन्मस्थळ तर आहेच पण तमाम शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान देखील आहे.        तर असा हा शिवनेरी किल्ला १२ व्या शतकापासून डौलात उभा आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यात आहे. जुन्नर किंवा जुन्नेर हे जीर्णनगर म्हणून इसवीसनापूर्वीपासून प्रसिद्ध आहे. जुन्नर हे नाणेघाट डोंगररांगात वसलेले एक प्रचलित शहर होते. तसेच नाणेघाटातून फार मोठ्या प्रमणात व्यापारी वाहतूक चालत असे. त्यामुळे या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मीती करण्यात आली त्यापैकीच एक शिवनेरी दुर्ग. कालांतराने येथे यादवांचे राज्य आले याच दरम्यान शिवनेरी दुर्गाला गडाचे स्वरूप आले. या शिवनेरी गडाने शकराजांपासून ते अगदी ब्रिटिश सांम्राज्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली पण सर्वात जास्त शिवनेरी किल्ला हा येथे झालेल्या बाल शिवाजी यांच्या जन्मस्थळामुळे जगप्रसिद्ध झा...

किल्ले कर्नाळा आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य - Karnala Fort & Karnala Bird Sanctuary

     मुंबईकरांच्या धकाधकीच्या आयुष्यात मनाला आनंद आणि खुप सोयीचे असलेले ठिकाण म्हणजे कर्नाळा. भल्या पहाटे निघाले तर एका दिवसाच्या भटकंतीत गिर्यारोहण (ट्रेकींग) आणि पक्षी निरिक्षणाचा आनंद घेता येतो.        जरा आपण या किल्ल्याच्या इतिहासात डोकावून बघूयात.      कर्नाळा हा किल्ला रायगड जिल्यातील पनवेल तालुक्यातील आहे. प्राचीन कालखंडापासून म्हणजे यादव (इ. स. ८५० ते इ. स. १३३४) काळापासून व्यापारावरील दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला प्रसिध्द होता असा उल्लेख आढळतो.        तर असा हा किल्ला छत्रपती शिवाजी महारांनी इ. स. १६५६ साली हा किल्ला स्वराज्यात आणला. नंतर पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेला, परत १६७० साली परत स्वराज्यात आणला असा हा कर्नाळा किल्ल्याचा इतिहास आहे.        ह्या किल्लावर एक सुळका आहे, तो अंगठ्या सारखा दिसतो म्हणून हल्ली  Thumb Point  म्हणूनही प्रसिध्द आहे. जस जसे आपण किल्ल्याच्या दिशेने प्रवास करत किल्ल्याजवळ येतो, तस तसा हा सुळका आपल्याला खुणावत राहतो. ह्या किल्ल्यावर येताना पायथ...

किल्ले रायगड Raigad Fort

इमेज
     किल्ले रायगड म्हणजे महाराष्ट्राचे एक पवित्र असे श्रद्धास्थान. स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, सहवासाने पावन झालेला, स्वराज्याची राजधानी असलेला, शिवराज्याभिषेक अनुभवलेला, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असा किल्ले रायगड.      किल्ले रायगडचे पूर्वीचे नाव रायरी असे होते. महाराजांनी १६५६ साली रायरीस वेढा घालून महिन्याभरात ताब्यात घेतला. आणि शत्रूला अवघड वाटणारा प्रदेश तसेच सागरी दळणवळण करण्यास सोयीचे असे ठिकाण म्हणून महाराजांनी रायरी किल्याची निवड केली व त्यास रायगड असे नामकरण केले.      किल्ल्याच्या पायथ्याजवळील पाचड गावात राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन रायगड किल्ल्याच्या दिशेने पावले टाकावी.     किल्ल्यावर बघण्यासारखे बसेच आहे. जसे महादरवाजा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, गंगासागराच्या दक्षिणेस असलेले दोन स्तंभ, कुशावर्त तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजसभा, नगारखाना, राजभवन, जगदीश्वाराचे मंदिर, बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी बुरूज, वाघ्या कु...