किल्ले रायगड Raigad Fort
किल्ले रायगड म्हणजे महाराष्ट्राचे एक पवित्र असे श्रद्धास्थान. स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, सहवासाने पावन झालेला, स्वराज्याची राजधानी असलेला, शिवराज्याभिषेक अनुभवलेला, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असा किल्ले रायगड.
किल्ले रायगडचे पूर्वीचे नाव रायरी असे होते. महाराजांनी १६५६ साली रायरीस वेढा घालून महिन्याभरात ताब्यात घेतला. आणि शत्रूला अवघड वाटणारा प्रदेश तसेच सागरी दळणवळण करण्यास सोयीचे असे ठिकाण म्हणून महाराजांनी रायरी किल्याची निवड केली व त्यास रायगड असे नामकरण केले.
किल्ल्याच्या पायथ्याजवळील पाचड गावात राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन रायगड किल्ल्याच्या दिशेने पावले टाकावी.
किल्ल्यावर बघण्यासारखे बसेच आहे. जसे महादरवाजा, खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, गंगासागराच्या दक्षिणेस असलेले दोन स्तंभ, कुशावर्त तलाव, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजसभा, नगारखाना, राजभवन, जगदीश्वाराचे मंदिर, बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी बुरूज, वाघ्या कुत्र्याची समाधी आणि ज्यासाठी एवढे कष्ट घेऊन जी तंगडतोड केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघितल्यावर अंगात भरलेला शिणवटा कुठल्याकुठे पळून जातो आणि आपसूकच महाराजांच्या समाधीपूढे आपोआप नतमस्तक होऊन मुजरा केला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय ही गर्जनाही आपसूकच तोंडून निघते.
कसे जायचे : महाड साठी मुंबई, पूणे, रत्नागिरी, कोल्हापूर येथून बससेवा आहेत. व तेथून पुढे पाचाडची गाडी करून रायगडच्या पायथ्याजवळ पोहोचणार, तिथून एकतर पायी किंवा रोप वे ने किल्ल्यावर पोहोचता येते.
राज्य : महाराष्ट्र
जिल्हा : रायगड
तालुका : महाड
Useful info..Thanks for sharing.
उत्तर द्याहटवाधन्यवाद राहुल
हटवा