दुरशेत - Durshet

    मुंबई आणि पुणे दरम्यान सह्याद्रीच्या कुशीत आणि अंबा नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य असे एक छोटे गाव आहे. दुरशेतचा परिसर सभोवताली डोंगराळ प्रदेश आणि पठाराने व्यापलेला आहे. मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे निवांत वेळ घालवण्यासाठी बरीच लोकं या ठिकाणी भेट देतात.


    दुरशेत हे ठिकाण येथील अप्रतिम सौंदर्याने नटलेले, पावसाळ्यात सगळीकडे दिसणारी हिरवळ, धबधब्यातून वाट काढत टेकट्यांकडे जाणार्‍या पायवाटा अशा या नाना विविध सौंदर्याने नटलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये खुप प्रसिध्द आहे.


    गिर्यारोहकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. दुरशेत हे अंबा नदीच्या किनारी असल्यामुळे येथे वन्यजीव तसेच मुबलक प्रमाणात वन्य संपदा येथे आढळते. हल्ली येथे पर्यटकांनची होणारी गर्दी पाहून येथे जलक्रिडांचे (Water Sports) आणि साहसी खेळांचे आकर्षण केंद्र बनले आहे. यात उत्साह, साहस आणि रोमांच भरणार्‍या अनेक खेळांचा समावेश आहे, जसे की रॅपलींग, वॉल-क्लाइंबिंग, टार्झन स्विंग इत्यादी.

 

    दुरशेत हे महाड येथील श्री वरदविनायक गणपती आणि पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती या दरम्यान वसलेले आहे म्हणून जर वेळ असेल तर धार्मिक लोकांसाठी देखील दुरशेतची भ्रमंती संस्मरणीय ठरू शकते.

 

जवळील ठिकाणे : लोणावळा १२ कि.मी, माथेरान ३१ कि.मी, कामशेत २८ कि.मी, लवासा ३९ कि.मी.

 

कसे जायचे : दुरशेतला जाताना स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच कारण तेथे जाण्यासाठी सार्वाजनिक वाहतूक मर्यादित आहे. मुंबईपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. तेथे जाताना मुंबई-पुणे महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चा वापर करावा.

 

कधी जायचे : पावसाळ्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंतचा काळ येथे भेट देण्यासाठी योग्य आहे.

 

जिल्हा : रायगड

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple