सांधण दरी - Sandhan Valley

    सह्याद्री पर्वत रांगेतील, अहमद नगर जिल्ह्यातील सामरद गावातील एक ठिकाण असे आहे जेथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटक, गिर्यारोहक, प्रस्तरारोहक येण्यासाठी आणि तिथला अनुभव घेण्यासाठी खुप आतूर असतात, अशी  निसर्गाचा  चमत्कार  असलेली  व आशिया  खंडातील  लांबीच्या  बाबतीत  दुसर्‍या  क्रमांकावर  असलेली ‘सांधण दरी’. आज आपण या सांधन दरी बद्दल माहिती घेऊ.

 

    अहमद नगर जिल्यातील अकोला तालुक्यातील सामरद या गावातून साधारण दीड ते दोन कि.मी. नागमोडी वळणदार वाटेने सांधण दरीजवळ पोचतो. मग सुरु होतो तो अविस्मरणीय, रोमांचीत करणारा खरा प्रवास.

 


***वरील छायाचित्र हे गुगल मॅप द्वारे घेतलेले आहे, तरीही अगदी स्पष्ट दिसत आहे यावरुनच सांधन दरीची भव्यता दिसून येते.


    सांधण दरीच्या सुरुवातीलाच समोर दिसणार्‍या नजार्‍याने या नैसर्गिक अद्भुत चमत्काराची, भव्यतेची जाणीव होते. सांधण दरी साधारण चारशे फुट खोल आणि सुमारे २ कि.मी. लांब आहे. दरीचा प्रवास एकदम खडतर असा खडकाळ आहे. थेडे पुढे गेल्यावर दोन पाण्याचे पडाव लागतात त्यातील पहिला पडावात पाणी दोन ते चार फुट खोल तर दुसर्‍या पडावात साधारण ४ ते ६ फुट खोल पाणी असते. येथे यायचे झाले तर शक्यतो एप्रिल, मे महिण्यात यावे जेणेकरून येथील पाण्याची पातळी कमी झालेली असते. जरी उन्हाळा असला तरी येथील वातावरण थंडच असते. दरी पार करताना काही ठिकाणी ३ फुट इतकी निमुळती वाट होते. कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीवर पोचतसुध्दा नाही, त्यामुळे येथे चढ आणि उतर सांभाळून करा. अजून थोडे पुढे गेल्यावर दरीच्या शेवटाकडे जाताना दोनदा रॅपलिंगच्या सहाय्याने खाली उतरावे लागते. तेथेच एक पठार सदृश्य जागेवर शिबिराची किंवा रात्री वास्तव्याची सोय असते. येथे आल्यावर समोरच एक रम्य तलाव दिसतो, व आजूबाजूचा परिसर न्याहळण्यात वेळ कसा जातो ते कळत नाही. येथे रात्री जेवणकरुन चांदण्यात उघड्यावर झोपण्यात मजा काही औरच, त्यात जर तुटता तारा दिसला आणि त्याचा आवाज ऐकलात तर स्वर्ग गाठल्याचा अनुभवाल. जर सोबत कोणी खगोल निरिक्षक असेल तर तुम्हाला मस्त तार्‍यांची महिती, फोटो घेत आकाशदर्शन करत रात्र कशी जाईल ते कळणारसुध्दा नाही. दरीच्या पार्श्वभूमीवर जर तार्‍यांचे फोटो मिळाले तर क्या बात.

 

    हे सर्व अनुभवण्यासाठी हा सांधण दरीचा ट्रेक कमीत कमी दोन दिवसाचा केलात तर उत्तमच.

 

  परतण्यासाठी आले तसे परत जाणे नाहीतर तेथून दिसणार्‍या छोट्या तलावाच्या काठाने करोली घाटात पोहोचू शकता, तेथून मग आजोबा पर्वताच्या पायथ्याजवळ पोहोचता येथे. अशा प्रकारे हा अविस्मरणीय ट्रेक तुम्ही पुर्ण करु शकता.

 

    जर जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करायची असल्यास सामरद गावामधून व्यवस्था होते, तसेच वाटाड्या (गाईड) व रॅपलिंगसाठी लागणारे साहित्यही येथे मिळते. मुख्यतः सांधन दरीत जाताना डोक्यावर हॅल्मेट परिधान करूनच जा कधी कधी छोटी मोठी दगडीही वरून पडत असतात त्यामूळे तुम्हाला इजा होण्याची शक्यता कमी होते आणि तुम्ही या रोमांचकारी, अविस्मरणीय, अद्भुत असा आनंद निरधोक घेऊ शकाल. 


    सर्वात महत्वाचे सांधन दरी ही पावसाळ्याच्या महिन्यात या दरीत पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत असतो आणि छोट्या मोठ्या दरडीही कोसळत असतात म्हणुन सुरक्षेच्या कारणास्तव स्थनिक प्रशासनातर्फे पूर्णपणे बंद केलेली असते.

 

शेवटी एक नेहमीची सूचना : येथे फिरताना कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी घ्या, निसर्गाचा आनंद घ्या आणि परिसराची स्वच्छता राखा.

 

 

जवळील ठिकाणे : भंडारदरा धरण, रतनगड, अलंग गड, मदन गड, कुलंग गड, आजोबा पर्वत आणि सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देणारे कळसुबाई शिखर

 

कसे जायचे : मुंबईमधून स्वतःच्या गाडीने जायचे झाल्यास मुंबई भिवंडी, ईगतपुरी, भंडारदरा मार्गे सामराद गावी पोहचून सांधन दरीला जाता येते. येथे यायचे झाल्यास खाजगी गाडीनेच येणे सोयीस्कर आहे, नाहीतर बर्‍याच गाड्या बदलून बदलून येण्यातच वेळ जाईल.

 

पुण्यातून यायचे झाल्यास शिवाजीनगर, खडकी, नारायणगाव, पाडाळणे, भंडारदरा मार्गे सामराद गावी पोहचून सांधन दरीला जाता येते.

 

कधी जायचे : शक्यतो नोव्हेंबर ते मे महिन्या दरम्यान

 

तालुका : अकोला

 

जिल्हा : अहमदनगर

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple