पोस्ट्स

Mumbai Park लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जुहू गार्डन - Juhu Garden

     जुहू गार्डन म्हटले की सर्वांना लहानपणाची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. कारण त्याकाळी मुंबईत गार्डनही मोचकीच होती त्यात या गार्डनमध्ये असलेल्या एका विशिष्ट कारणामुळे हे गार्डन खुप प्रसिद्ध होते. आणि ते कारण म्हणजे या गार्डनमध्ये एक सिमेंटचे काँक्रिटचे बनवलेले विमान. हे गार्डन साधारणपणे ५० वर्षे जुने आहे. ते बृहन मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित येते. सध्या हे गार्डन लायन्स जुहू म्युनिसिपल पार्क या नावाने ओळखले जाते.       ज्याकाळात सामान्य व्यक्तीला विमान पाहणे आणि विमानात बसणे दुरापास्त होते त्याकाळात अबालवृद्धांचे विमानात बसण्याची हौस मौज पुरवणारे ठिकाण म्हणजेच हे जुहूचे गार्डन. तसे पाहिले तर जुहू समुद्र किनारी फिरायला जाणारे आवर्जून ह्या गार्डनला भेट देतात.       तर हे विमान १९६० च्या दशकात एअर इंडिया या विमान सेवा पुरवणार्‍या कंपनीने बोईंग ७०७-४३६ या बनावटीच्या विमानाची सिमेंट काँक्रिटचे प्रतिरुप या गार्डनसाठी मुंबई महानगर पालिकेला भेट दिली आहे असे कळते. मध्यंतरी या विमानाचे काही अवशेष कोसळल्यामुळे अपघात झाला होता त्यामुळे ...