पोस्ट्स

Temple Near Mumbai लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य - Bhimashankar Wildlife Sanctuary

     भीमाशंकर म्हटले की पहिली ओळख येते ती म्हणजे बारा ज्योतिर्लिंगपैकी एक, स्वंभू शिवलिंग असलेले शिवशंकराचे मंदिर. भीमाशंकर हे सह्याद्रीच्या कुशीत, आणि पुण्यातील खेड तालुक्यात वसलेले एक तिर्थक्षेत्र तसेच थंड हवेचे ठिकाण. येथे नेहमी भाविक, निसर्गप्रेमी, गिर्यारोहक, पशू पक्षीनिरिक्षक, वनौषधींचे अभ्यासक यांचा राबता असतो.        येथे येणारे सर्वजण या हेमांडपंथी बांधकाम, नक्षीकाम असलेले भीमाशंकर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहूनच प्रसन्न होतात. या मंदिरात चांदीचे शिवलिंग आहे. मंदिराच्या बाहेरील आवारात दोन मोठे दगडी नंदी, तसेच वसईच्या युध्दात पेशव्यांनी जिंकलेली एक विशाल घंटा ठेवलेली पहावयास मिळते. भीमाशंकर मंदिरात श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते, त्यावेळी लाखो भाविक मोठ्या श्रध्देने मंदिराला भेट देतात.        मंदिराच्या पुर्व दिशेने थोडे खाली उतरले की जंगलाची सुरुवात होते. भीमाशंकरचे जंगल ठाणे, रायगड, पुणे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये साधारण १२०-१२५ चौरस कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे. हे जंगल उंचच उंच झाडींनी वेढलेले आहे, त्य...

वज्रेश्वरी - Vajreshvari

      गिर्यारोहण (ट्रेकिंग) किंवा भटकंती त्याचबरोबर देवदर्शन करणार्‍यांसाठी वज्रेश्वरी एक उत्‍तम ठिकाण आहे.      येथे जातानाच मन प्रसन्‍न होऊन जाते कारण येथील वाटच मुळात नदीतून जाते, त्यामुळे नदीच्या पाण्यात मस्ती करत, आजूबाजूचा निसर्ग बघत कधी वज्रेश्वरीला पोचणार ते कळणारसुद्धा नाही. हा परिसर घनदाट वनराईने वेढलेला असल्यामुळे येथे थंडगार आणि आल्हाददायी हवा, अशा सुंदर शांततेत पक्षांचा सुमधूर किलबिलाट यामुळे वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होतो.      येथे खासकरुन लोक गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी आणि कुंडाजवळच वज्रेश्वरी मातेचे मंदिर आहे ज्यात तीन देवीच्या मुर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्‍या संखेने येतात.   कसे जायचे :  बोरीवली, ठाणे, वसई, विरार, कल्याण, भिवंडी येथून एसटीने वज्रेश्वरीला जाऊ शकतो. कधी जायचे :  वर्षाचे बारा महिने कधीही राज्य  :  महाराष्ट्र जिल्हा :  ठाणे