पोस्ट्स

Temple लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple

इमेज
  छायाचित्र सौजन्य : श्री. व सौ. चित्रा योगेंद्र धोत्रे      तांबडी सुर्ला येथील हे महादेवाचे मंदिर कदंब शैलीतील १२ व्या शतकातील आहे. साधारण इ. स. १० ते १३ व्या शतकात गोव्यामध्ये कदंब राजवट होती. आज फारच कमी ठिकाणी कदंब स्थपत्य शैलीतील वास्तू दिसतात, त्यापैकी हे गोव्यातील महादेवाचे एक प्रचीन मंदिर आहे.        हे नितांत सुंदर मंदिर गोवा कर्नाटक राज्यांना जोडणार्‍या अंबोड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मोलेम अभयारण्यात वसलेले आहे. त्यामुळे या मंदिराकडे जाणारा मार्ग मस्त हिरव्यागार झाडांनी आच्छादलेला असल्यामुळे हा प्रवास आल्हाददायक वाटतो.        हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर बेसॉल्टच्या दगडांनी बनवलेले आहे. प्रथम दर्शनी मंदिर बघतानाच आपल्याला या मंदिरावर केलेल्या कलाकुसरीची भुरळ पडते. मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या कठड्‍यावरील नक्षीकाम बघतच मंदिराच्या तीन द्वार असलेल्या सभामंडपात नकळत प्रवेश होतो. सभामंडपात भग्नावस्थेतील नंदी दिसतो, व सुबक कलाकुसर केलेले त्रिस्तरीय दगडी खांब आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराचे छत अष्टकोणी कमळ...