पोस्ट्स

Cave लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गांधारपाले लेणी, महाड - Gandharpale Caves, Mahad

   मुंबई गोवा मार्गावरील प्राचीन काळापासून एक महत्वाचे व्यापारी ठिकाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्यामुळे प्रसिद्ध असलेले महाड. महाड परिसरात येताच बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात लांबून दिसणारी लेणी आपल्याला खुणावत असते तीच गांधारपाले बौद्ध लेणी.       तर मग आज आपण या गांधारपाले बौद्ध लेण्याविषयी माहिती जाणून घेऊ या.       या परिसरातून गांधारी नदी वाहते, व लेण्याजवळ असलेल्या शिलालेखानुसार या प्रांतावर इ. स. १३० च्या दरम्यान बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांचे राज्य होते असे समजते, या पुलित राजाच्या नावावरूनच पुढे या गावाचे नाव पाले झाले असावे, कालांतराने गांधार नदी जवळील प्रदेश असल्यामुळे पाले हे गाव गांधारपाले या नावाने ओळखले जाऊ लागले. तर राजा विष्णु पुलित यांच्या कालखंडात ही तीन मजली बौद्ध लेणी २८-३० छोट्‍या मोठ्‍या लेण्यांच्या समुहात हीनयान पद्धतीने कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये ३ बौद्ध स्तुप, साधारण १५ पाण्याची टाकं आणि ब्राम्ही भाषेतील ३ शिलालेख आहेत.       त्यात...

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

     भारतात जागोजागी डोंगरात कोरलेल्या लेण्या दिसतात. त्यापैकी एक खेड रत्नागिरी मध्ये असलेल्या बौद्ध लेणीसंबंधी आज आपण माहिती घेऊया.        रत्नागिरीचे खेड एक गजबजलेले ठिकाण आहे. तर याच गजबजलेल्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर एक बौद्ध लेणी आहे. ही लेणी खेडची बौद्धलेणी म्हणूनच प्रसिद्ध आहे.        या लेणीमध्ये एक चैत्य विहार आहे तसेच भिखुंना साधना करण्यासाठी तसेच राहण्यासाठी तीन खोल्याही आहेत. कालांतराने खेड ते दापोली, हर्णे बंदर हा व्यापारी मार्ग असल्यामुळे येथे व्यापारीवर्ग तसेच प्रवासी आराम करण्यासाठीसुद्धा या लेणीचा वापर करत असावेत.        ही लेणी जास्तकाळ दुर्लक्षित राहील्यामुळे लेणीची सविस्तर माहिती मिळणे अवघड आहे.        परिसरात कोणताही कचरा तसेच कोणत्याही प्रकारचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या व आपला अमुल्य वेळ आनंदी करावा.        सदर माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून संकलित केलेली आहे.        वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमें...