रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri
भारतात जागोजागी डोंगरात कोरलेल्या लेण्या दिसतात. त्यापैकी एक खेड रत्नागिरी मध्ये असलेल्या बौद्ध लेणीसंबंधी आज आपण माहिती घेऊया. रत्नागिरीचे खेड एक गजबजलेले ठिकाण आहे. तर याच गजबजलेल्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर एक बौद्ध लेणी आहे. ही लेणी खेडची बौद्धलेणी म्हणूनच प्रसिद्ध आहे. या लेणीमध्ये एक चैत्य विहार आहे तसेच भिखुंना साधना करण्यासाठी तसेच राहण्यासाठी तीन खोल्याही आहेत. कालांतराने खेड ते दापोली, हर्णे बंदर हा व्यापारी मार्ग असल्यामुळे येथे व्यापारीवर्ग तसेच प्रवासी आराम करण्यासाठीसुद्धा या लेणीचा वापर करत असावेत. ही लेणी जास्तकाळ दुर्लक्षित राहील्यामुळे लेणीची सविस्तर माहिती मिळणे अवघड आहे. परिसरात कोणताही कचरा तसेच कोणत्याही प्रकारचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या व आपला अमुल्य वेळ आनंदी करावा. सदर माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून संकलित केलेली आहे. वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमें...