पोस्ट्स

Fort लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सज्जनगड (सातारा) - Sajjangadh (Satara)

        सज्जनगड  म्हटले  की  सर्वप्रथम  डोळ्यासमोर  येतात  ते  समर्थ  रामदास  स्वामी.  कारणही  तसे  आहे  म्हणा, निजामाकडून मराठ्‍यांनी हा जिंकून घेतला व  शिवाजी  महाराजांनी   * (यावेळी  शिवाजी  महाराजांचा  राज्याभिषेक झाल्या  नसल्याकारणाने  येथे  शिवाजी  महाराज  असा  उल्लेख  केला  आहे.)  समर्थ  रामदास   स्वामींना   गडावर कायमच्या  वास्तव्यासाठी  विनंती  केल्यामुळे  ते  कायमचे  वास्तव्यास  आले  व  या  गडाचे  नाव  नौरससातारा  चे सज्जनगड असे झाले ते आजता गायत.        तर हा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडाची आज आपण माहिती घेणार आहोत.       सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्‍यातील कारी, परळी, गजवाडी या गावांनी वेढलेला आहे. ...

शिवनेरी किल्ला - Shivneri Fort

     आज आपण जगप्रसिद्ध अशा शिवनेरी किल्ल्याबद्दल महिती घेणार आहोत. कारणही आज तसेच आहे ना आज दिनांक १९ फेब्रुवारी, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि शिवनेरी किल्ला हे त्यांचे जन्मस्थळ तर आहेच पण तमाम शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान देखील आहे.        तर असा हा शिवनेरी किल्ला १२ व्या शतकापासून डौलात उभा आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यात आहे. जुन्नर किंवा जुन्नेर हे जीर्णनगर म्हणून इसवीसनापूर्वीपासून प्रसिद्ध आहे. जुन्नर हे नाणेघाट डोंगररांगात वसलेले एक प्रचलित शहर होते. तसेच नाणेघाटातून फार मोठ्या प्रमणात व्यापारी वाहतूक चालत असे. त्यामुळे या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मीती करण्यात आली त्यापैकीच एक शिवनेरी दुर्ग. कालांतराने येथे यादवांचे राज्य आले याच दरम्यान शिवनेरी दुर्गाला गडाचे स्वरूप आले. या शिवनेरी गडाने शकराजांपासून ते अगदी ब्रिटिश सांम्राज्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली पण सर्वात जास्त शिवनेरी किल्ला हा येथे झालेल्या बाल शिवाजी यांच्या जन्मस्थळामुळे जगप्रसिद्ध झा...

चौल रेवदंडा - Chaul Revdanda

     आज आपण पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्याविषयी माहिती घेऊया. तर कुंडलिका नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम होतो असे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालूक्यातील रेवदंडा गाव. या रेवदंडा गावातून जंजिर्‍याच्या सिद्धीच्या आणि मुंबईकर इंग्रजाच्या सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगिज कॅप्टन सोज याने १५२८ साली किल्ला बांधावयास सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी १५२१ ते १५२४ सालादरम्यान रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून घेतली. या रेवदंडा गडावर तीन राज्यकर्त्यांनी राज्य केले एक अर्थातच पोर्तुगिज दुसरे मराठे आणि तिसरे इंग्रज. तर हा झाला रेवदंडा किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास.        किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच पोर्तुगिजांचे राजचिन्ह कोरलेले दिसते. हा किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडे असला तरी काही ठिकाणी किल्ल्यावर खाजगी मालकी हक्‍क असल्याचे समजून येते त्यामुळे संपूर्ण किल्ला पहावयास मिळत नाही. किल्ला आणि भोवतालची तटबंदी बर्‍याच ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत आहेत.        किल्ला पाहून झाल्यानंतर पश्चिमेस असलेला नितांत सुंदर नारळी पोफळीच...