बारवी धरण अंबरनाथ/बदलापूर - Barvi Dam (Ambarnath/Badlapur)

    पाऊस पडायला लागला की सर्वांना मस्त पाण्यात डुंबायला, भिजायला आवडते. मग सुरु होते पावसाळी सहलीची लगबग, कुठे जायचे कसे जायचे याची चर्चा. म्हणुनच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मुंबईजवळील बारवी नदीवर बांधलेल्या बारवी धरणाच्या परिसराची माहिती.

    तर बारवी धरणाला भेट देण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहेत ती मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानके. त्यामुळे लोकल ने जायचे झाल्यास सकाळी लवकरच प्रवास केलेला बरा. नाहीतर स्वत:चे वाहन असल्यास सकाळी लवकर रस्तेमार्गे जाणे योग्य कारण उशीरा निघाल्यास रस्तेमार्गे जाताना वाहतुकीत वेळेचा खोळंबा होण्याची शक्यता असते.


    अंबरनाथ किंवा बदलापूरवरून बारवी धरणाकडे दोन्ही बाजूने हिरवीगार झाडीतून जाणारा नागमोडी रस्ता पार करीत जेव्हा धरणाजवळ पोहोचतो त्यावेळी बारवी धरणाचा काठोकाठ भरलेला जलाशय आणि तिथले नयनरम्य निसर्ग पाहिल्यावर प्रवासात जाणवलेला थकवा कुठल्याकुठे पळून जाईल व एकदम मोकळ्या हवेत ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल.


    हा परिसर जंगलाने वेठलेला असल्यामुळे रस्त्याने येताना काही जंगली पशुपक्षी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका व घाबरुन त्यांना कोणती ईजा करू नका, कारण आपण त्यांच्या निवासस्थानात आलो आहोत याचे भान ठेवून वागले पाहिजे.


    धरणाच्या परिसरात तुम्ही पक्षी निरिक्षणही करु शकता. आणि शक्यतो धरणाच्या पाण्यात मजा मस्ती करताना थोडी सावधानता बाळगा कारण धरणाच्या पाण्यात असंख्य भवरे आहेत त्यामुळे जीवाशी खेळ होईल असे कृत्य करू नये. येथे येताना खाण्यासाठी घरुनच खाण्यासाठी डबा आणलेला बरा. कारण येथे लोकवस्ती नसल्यामुळे आपल्या पोटोबाची सोय आपणच केलेली बरी. अन्यथा परतीच्या वाटेवर काही उपहार गृहे आहेत तेथे तुम्ही जेवण करू शकता.


    धरणाचा परीसर पाहून आणि पाण्यात मजा मस्ती करून झाल्यानंतर तुम्ही इतक्या जवळ आलाच आहात तर अंबरनाथचे प्रसिद्ध प्राचिन शिवमंदिर पाहून घरची वाट धरु शकता.

अशाप्रकारे एक पावसाळी सहल सहज करु शकाल.


    *विषेश सुचना धरण तसेच जंगल परिसरात आपल्यामुळे कुठेही कचरा होणार नाही याची काळजी घ्या.

 

    तुम्हाला माहीती कशी वाटली ते आवर्जून कमेंट्स करून आम्हाला कळवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास सामायिक (शेअर) करा आणि सभासद व्हा (सबस्क्राईब करा).

 

जवळील ठिकाण : अंबरनाथचे प्रसिद्ध प्राचिन शिवमंदिर.

 

कधी जायचे : साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात.

 

कसे जायचे : मुंबईमधून जायचे झालेतर मध्य रेल्वेच्या अंबरनाथ किंवा बदलापूर लोकलने उतरून जाता येते.

स्वत:चे वाहन असल्यास उत्तम.

 

जिल्हा : ठाणे

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple