गांधारपाले लेणी, महाड - Gandharpale Caves, Mahad
तर मग आज आपण या गांधारपाले बौद्ध लेण्याविषयी माहिती जाणून घेऊ या.
या परिसरातून गांधारी नदी वाहते, व लेण्याजवळ असलेल्या शिलालेखानुसार या प्रांतावर इ. स. १३० च्या दरम्यान बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांचे राज्य होते असे समजते, या पुलित राजाच्या नावावरूनच पुढे या गावाचे नाव पाले झाले असावे, कालांतराने गांधार नदी जवळील प्रदेश असल्यामुळे पाले हे गाव गांधारपाले या नावाने ओळखले जाऊ लागले. तर राजा विष्णु पुलित यांच्या कालखंडात ही तीन मजली बौद्ध लेणी २८-३० छोट्या मोठ्या लेण्यांच्या समुहात हीनयान पद्धतीने कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये ३ बौद्ध स्तुप, साधारण १५ पाण्याची टाकं आणि ब्राम्ही भाषेतील ३ शिलालेख आहेत.
त्यातील मुख्य लेणी जी १ क्रमांकाने ओळखल्या जाणार्या लेणीच्या प्रथम दर्शनी सहा खांब आहेत त्यातील एकच खांब पूर्ण कोरलेला आहे. मग ओसरी लागते त्यानंतर ३ दरवाजे आहेत त्यातुन आपण प्रार्थनागृह/ध्यानगृह प्रवेश करतो, येथे शक्यतो त्याकाळी वर्षावासाच्या काळात म्हणजे पावसाळाच्या काळात ध्यान धारना व ध्यान साधना तसेच धम्म प्रवचन यांसाठी या कक्षाचा उपयोग होत असे. त्या समोर गर्भगृह तसेच खोल्या ही आहेत. त्यातील एका गर्भगृहात भगवान बुद्धांची मुर्ती कोरण्यात आली आहे, मुर्तीच्या खालील भागात धम्मचक्र, हरणे, आकाशात उडणारे यक्ष कोरलेले दिसतात.
बहूतांश येथे असलेल्या लेण्या लहान मोठ्या आकाराच्या आहेत. त्यातील पाहण्यासारख्या लेणी क्रमांक १, ८, १५, २१ या महत्वाच्या आहेत. लेण्याच्या परिसरातून आजूबाजूचा परिसर अगदी मनमोहक दिसतो. संपूर्ण लेण्या पाहण्यासाठी साधारण एक तास पुरेसा आहे. या लेण्यातील काही अवशेष निखळून खाली पायथ्याजवळ पडलेले दिसतात.
ही लेणी तसेच इतरही एतिहासिक वारसा असलेल्या वास्तू तिथे कोणी आपल्या नावचा ठसा उमटवून आपला प्राचीन अमुल्य ठेवा विदृप करु नका अशी कळकळीची एक नम्र विनंती.
सद्ध्या या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायथ्यापासून पायर्यांची सोय प्रशासनाने केली असल्यामुळे लेण्यांपर्यंत जाण्याचा मार्ग सुखकर होतो. त्यामुळे अवश्य या गांधारपाले लेणीला अवश्य भेट द्या व एक प्राचीन भारताचा अमुल्य ठेवा बघितल्याचा अनुभव घ्या.
सदर माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून संकलित केलेली आहे.
वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरुर कळवा. माहिती आवडल्यास सामायिक (शेअर) करा आणि सभासद व्हा (सबस्क्राईब करा).
जवळील ठिकाणे : रायगड किल्ला, महाडचे चवदार तळे
कधी जायचे : कधीही वर्षाचे बारा महिने. शक्यतो पावसाळ्यानंतर उत्तम, कारण पावसाळ्यात पायर्या निसरड्या होतात त्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त असते म्हणून.
कसे जायचे : मुंबईहून मुंबई गोवा मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ने महाड बस स्थानकाच्या तीन कि. मी. आधी गांधारपाले गाव लागते हे अंतर साधारण १७३ कि. मी. आहे. येथे उतरल्यावर गांधारपाले लेणीचा फलक दिसेल तेथूनच लेण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग दिसेल.
पुणे येथून यायचे झाल्यास नसरापूर, भोर, बिरवाडी, महाड मार्गे साधारण १३४ कि. मी. अंतरावर आहे. दुसरा मार्ग हा पिरंगुट, मुळशी, माणगाव साधारण १३९ कि. मी. अंतरावर आहे.
तालुका : महाड
जिल्हा : रायगड
राज्य : महाराष्ट्र
Khup chhan
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर्वांना...
उत्तर द्याहटवा