तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple

 


छायाचित्र सौजन्य : श्री. व सौ. चित्रा योगेंद्र धोत्रे

    तांबडी सुर्ला येथील हे महादेवाचे मंदिर कदंब शैलीतील १२ व्या शतकातील आहे. साधारण इ. स. १० ते १३ व्या शतकात गोव्यामध्ये कदंब राजवट होती. आज फारच कमी ठिकाणी कदंब स्थपत्य शैलीतील वास्तू दिसतात, त्यापैकी हे गोव्यातील महादेवाचे एक प्रचीन मंदिर आहे.

 

    हे नितांत सुंदर मंदिर गोवा कर्नाटक राज्यांना जोडणार्‍या अंबोड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मोलेम अभयारण्यात वसलेले आहे. त्यामुळे या मंदिराकडे जाणारा मार्ग मस्त हिरव्यागार झाडांनी आच्छादलेला असल्यामुळे हा प्रवास आल्हाददायक वाटतो.

 

    हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर बेसॉल्टच्या दगडांनी बनवलेले आहे. प्रथम दर्शनी मंदिर बघतानाच आपल्याला या मंदिरावर केलेल्या कलाकुसरीची भुरळ पडते. मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या कठड्‍यावरील नक्षीकाम बघतच मंदिराच्या तीन द्वार असलेल्या सभामंडपात नकळत प्रवेश होतो. सभामंडपात भग्नावस्थेतील नंदी दिसतो, व सुबक कलाकुसर केलेले त्रिस्तरीय दगडी खांब आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराचे छत अष्टकोणी कमळांच्यासहाय्याने सजलेले आहे. मंदिराच्या गाभार्‍याच्या दरवाज्या जवळ द्वारपालासारख्या दोन्ही बाजूला एकमेकांत गुंतलेल्या दोन फणाधारी नागांचे शिल्प आहेत. गाभार्‍यात एक शिवलिंग आहे. असे म्हणतात की या मंदिरात किंग कोब्रा नागाचे कायम वास्तव्य असते. मंदिराच्या बाहेरील बाजूने गाभार्‍यावर भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रम्हा यांच्या उठावदार नक्षीकाम केलेले शिल्प दिसतात. आजूबाजूच्या परिसरही नितांत सुंदर आहे.

 

    गोव्यातील इतर मंदिरांच्या तुलनेने लहान आणि मुख्य वस्तीपासून दुर्गम भागात असले तरीही येथे आजूबाजूच्या खेड्‍यापाड्‍यात राहणारे रहिवासी महाशिवरात्रीचा उत्सव एकदम उत्साहाने साजरा करतात.

 

    वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरुर कळवा. माहिती आवडल्यास सामायिक (शेअर) करा आणि सभासद व्हा (सबस्क्राईब करा).

 

जवळील ठिकाणे : भगवान महावीर अभयारण्य, मोलेम राष्ट्रीय उद्यान

 

कसे जायचे : पणजी शहरापासून तांबडे सुर्ला महादेव मंदिर साधारण ६८ कि. मी. अंतरावर आहे.

 

कधी जायचे : पावसाळ्याच्या काळात येथील वातावरण एकदम आल्हाददायक असते.

 

राज्य : गोवा


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, Please let me know

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)