सांधण दरी - Sandhan Valley

सह्याद्री पर्वत रांगेतील, अहमद नगर जिल्ह्यातील सामरद गावातील एक ठिकाण असे आहे जेथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटक, गिर्यारोहक, प्रस्तरारोहक येण्यासाठी आणि तिथला अनुभव घेण्यासाठी खुप आतूर असतात, अशी निसर्गाचा चमत्कार असलेली व आशिया खंडातील लांबीच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर असलेली ‘सांधण दरी’ . आज आपण या सांधन दरी बद्दल माहिती घेऊ. अहमद नगर जिल्यातील अकोला तालुक्यातील सामरद या गावातून साधारण दीड ते दोन कि.मी. नागमोडी वळणदार वाटेने सांधण दरीजवळ पोचतो. मग सुरु होतो तो अविस्मरणीय, रोमांचीत करणारा खरा प्रवास. *** वरील छायाचित्र हे गुगल मॅप द्वारे घेतलेले आहे, तरीही अगदी स्पष्ट दिसत आहे यावरुनच सांधन दरीची भव्यता दिसून येते. सांधण दरीच्या सुरुवातीलाच समोर दिसणार्या नजार्याने या नैसर्गिक अ द् भुत चमत्काराची, भव्यतेची जाणीव होते. सांधण दरी साधारण चारशे फुट खोल आणि सुमारे २ कि.मी. लांब आहे. दरीचा प्रवास एकदम खडतर असा खडकाळ आहे. थेडे पुढे गेल्यावर दोन पा...