उत्तन समुद्र किनारा आणि माता वेलंकणी चर्च - Uttan Beach & Mother Velankanni Church
महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर महानगर पलिकेच्या हद्दीत असणारे आणि मुंबईच्या उत्तर समुद्री किनार्यावर वसलेले उत्तन हे गाव. उत्तनला शांत आणि विरळ असलेली वस्ती व त्यांच्या घरांची ठेवण बघून लोक मिनी गोवा सुद्धा म्हणतात. उत्तनला लाभलेला सुंदर असा समुद्री किनारा म्हणून इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी असल्यामुळे येथील शनिवार आणि रविवारी भरणारा मासळी बाजार ताज्या माश्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून बहूतेक मुंबईकर शनिवार, रविवारच्या सुट्टीचा आनंद आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी उत्तनला जरुर भेट देतात. उत्तनचा सागरी किनारा हा नारळ, फोफळीच्या झाडांनी बहरलेला आहे. तसा हा दुरलक्षित सागरी किनारा असल्यामुळे इथे निवांत समुद्र किनारी फेरफटका मारत, मजामस्ती करत सहज दिवस निघून जातो. येथे जास्तकरुन ख्रिच्छन कोळी समाज असल्यामुळे भाटे बंदरात असलेले माता वेलंकणी चर्च प्रसिद्ध आहे. मुख्यकरून येथे २९ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर या कालावधील वार्षिक जत्रा भरते, त्यावेळी या माता वेलंकणी चर्चला देश परदेशातून लाखो भावि...