गोराई बीच - Gorai Beach
मुंबईच्या गोंगाटापासून दूर जायचे आहे, समुद्रात डुंबायचेपण आहे आणि जास्त लांब जायचे नाही. तर मग गोराई बीच आहे की हाकेच्या अंतरावर. मस्त नारळाच्या झाडांनी वेढलेला, लडीवाळपणे उसळणार्या लाटा. रेशमी रेती आणि त्यात मस्त बीच क्रिकेट, वॉलीबॉल खेळण्यात कसा वेळ जाईल ते कळणार सुद्धा नाही. त्याशिवाय तेथे घोडे आणि उंट यांची सवारी सुद्धा करता येईल, आणि पेटपूजेसाठी तेथे किनार्यावर चाट, नारळपाणी, कुल्फी, थंडा यांचे विक्रेतेही आहेतच, पण घरचे खाण्याचे पदार्थ नेणे कधीही चांगलेच नाही का? मग कधी भेट देता गोराई बीचला जवळील ठिकाणे : एस्सेल वर्ल्ड, वॉटर किंगडम, गोल्डन पॅगोडा कसे जायचे : पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्टेशनच्या पश्चिमेकडून बसने किंवा रिक्षाने गोराई जेटी पर्यंत जायचे, तेथून पुढे लॉंच ने पलिकडच्या किनारी उतरून पुन्हा रिक्षा किंवा टांगा करुन गोराई बीचला पोचाल, तसेच भाईंदर पश्चिम वरुन सुद्धा एस.टी. बस ने गोराईला जाता येते. कधी जायचे : कधीही जाता येते. राज्य : महाराष्ट्र जिल्हा : मुंबई