वज्रेश्वरी - Vajreshvari

      गिर्यारोहण (ट्रेकिंग) किंवा भटकंती त्याचबरोबर देवदर्शन करणार्‍यांसाठी वज्रेश्वरी एक उत्‍तम ठिकाण आहे.


     येथे जातानाच मन प्रसन्‍न होऊन जाते कारण येथील वाटच मुळात नदीतून जाते, त्यामुळे नदीच्या पाण्यात मस्ती करत, आजूबाजूचा निसर्ग बघत कधी वज्रेश्वरीला पोचणार ते कळणारसुद्धा नाही. हा परिसर घनदाट वनराईने वेढलेला असल्यामुळे येथे थंडगार आणि आल्हाददायी हवा, अशा सुंदर शांततेत पक्षांचा सुमधूर किलबिलाट यामुळे वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास होतो.


     येथे खासकरुन लोक गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी आणि कुंडाजवळच वज्रेश्वरी मातेचे मंदिर आहे ज्यात तीन देवीच्या मुर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्‍या संखेने येतात.

 

कसे जायचे : बोरीवली, ठाणे, वसई, विरार, कल्याण, भिवंडी येथून एसटीने वज्रेश्वरीला जाऊ शकतो.


कधी जायचे : वर्षाचे बारा महिने कधीही


राज्य : महाराष्ट्र


जिल्हा : ठाणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जव्हार - Jawhar

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple