गिल्बर्ट टेकडी (हिल) - Gilbert Hill

     आज आपण मुंबईस्थीत एका दुर्लक्षित जागतिक वारसाबद्दल माहिती घेऊयात.


    मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेली ही जागतिक वारसा लाभलेली वास्तु म्हणजे गिल्बर्ट टेकडी (हिल). सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मेझोझिक कालखंडात पृथ्वीच्या गर्भातून झालेल्या ज्वालामुखीच्या लावारसातून त्याकाळी ५६ एकर पसरलेली आणि २०० फुट उंच तयार झालेली स्तंभरुपी कडा असलेली टेकडी म्हणजेच गिल्बर्ड टेकडी (हिल). अशाप्रकारच्या स्तंभरुपी कडा असलेल्या आश्चर्यकारक आणि भौगोलिक दृष्ट्‍या दुर्मिळ असलेल्या टेकड्‍या किंवा डोंगर हे जगात फक्‍त तीनच ठिकाणी आहेत त्यातली एक आपल्या भारतातील महाराष्ट्रात असलेल्या मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट टेकडी (हिल). दुसरे अशाच पद्धतीने तयार झालेल्यांपैकी एक आहे वायोमिंगमधील डेविल्‍स टॉवर आणि दुसरे पूर्व कॅलिफोर्निया अमेरिका येथील डेव्हिल्स पोस्टपाईल अशी ही अद्‍भुत निसर्गाचा अविस्कार असलेली ठिकाणे आहेत.


    गिल्बर्ट टेकडी ही सुरुवातीस ५६ एकर परिसात पसरलेली ही टेकडी सद्‍ध्या काही लोकांनी अजानतेपणे केलेल्या खोदकामामुळे काही एकर येवढीच टेकडी उरलेली आहे. या टेकडीचे काही अवशेष जोगेश्वरीमध्ये देखील आढळलेले आहेत. गिल्बर्ट टेकडीला १९५२ साली वन कायद्यांतर्गत तत्कालिन केंद्र सरकारने राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले, आणि २००७ साली भूगर्भशास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्‍नांनतर बृहन्मुंबई महानगर पालिकेने या टेकडीला ग्रेड ॥ ची वारसा (हेरिटेज वास्तू) रचना म्हणून घोषित केले व तेथील आजूबाजूच्या परिसरात होणारे उत्खनन आणि इतर कामांना प्रतिबंध केले आहे.


      या दोनशे फुट उंच असलेल्या टेकडीवर जाण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. वर टेकडीवर एक सुंदर अशी छोटी बाग आहे, तसेच गावदेवी आणि दुर्गामातेचे अशी दोन मंदिरे देखील आहेत. या टेकडीच्या माथ्यावरुन मुंबई उपनगराचे विहंगम दृश्य दिसते. येथून सूर्योदय आणि सूर्यास्त देखील अप्रतिम दिसतो.

तर या अशा जागतिक वारसा लाभलेल्या गिल्बर्ट टेकडी (हिल) ला कधी भेट देता.

 

     शेवटी एक नेहमीची सूचना : या ठिकाणी फिरताना कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी घ्या, निसर्गाचा आनंद घ्या आणि परिसराची स्वच्छता राखा.

 

जवळील ठिकाणे : वर्सोवा समुद्रकिनारा, मड आयलँड, जुहू समुद्रकिनारा


कसे जायचे : पश्चिम रेल्वेमधील अंधेरी स्थानकात उतरुन तुम्ही बसने भवन्स महाविद्यालय बस स्थानकात उतरून चार ते पाच मिनिटे चालत जावे लागते. आणि जर मेट्रोने जायचे झाल्यास आझाद नगर मेट्रो स्थानकात उतरून भवन्स महाविद्यालयाच्या दिशेने जवळपास १० ते ११ मिनिटे चालत जावे लागते.


कधी जायचे : जास्तकरुन सकाळी आणि संध्याकाळी जाणे उत्तम कारण उन्हाचा त्रास कमी होतो. उन्हाळ्यात जाणे शक्यतो टाळावे.


तालुका : अंधेरी


जिल्हा : मुंबई


राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जव्हार - Jawhar

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple