रेड कार्पेट मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय - Red Carpet Wax Museum

    आज आपण मुंबईतील पहिले मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय जे घाटकोपर मधील आर. सिटी मॉल मध्ये वसलेले आहे त्यासंबंधी माहिती घेऊयात. 


    हे संग्रहालय जवळपास १००० चौरस फुट क्षेत्रात पसरलेले आहे. ते बनवताना साधारण ५ वर्षांचा अवधी लागला कारण त्यांना तिथे फक्‍त पुतळेच ठेवायचे नव्हते तर त्या पुतळ्यांबरोबरच त्या व्यक्‍तिमत्वाचा अभ्यास करुन त्या व्यक्‍तींनी केलेल्या कार्यांचा त्या पुतळ्यांभोवती वातावरण निर्मिती करायची होती म्हणून एकढा अवधी हे संग्रहालय बनवण्यास लागला. हे संग्रहालय डिसेंबर २०१६ साली सर्वांसाठी खुले केले.


    येथे जगातील सर्वोत्कृष्ट असे समाजसेवक, राजकारणी, सिनेसृष्टीतील सिने तारे - तारका, क्रीडापटू, वैज्ञानिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचे मेणाचे पुतळे येथे आहेत, त्यात दलाई लामा, नेल्सन मंडेला, मायकल जॅक्शन, बराक ओबामा, मदर तेरेसा, अब्राहिम लिन्कन, अण्णा हजारे, सायना नेहवाल, मेसी अजून असे जवळपास ४० व्यक्‍तींचे मेणाचे पुतळे आहेत, त्यांच्याबद्‍दलची माहितीही येथे तुम्हाला दिली जाते. त्याशिवाय तुम्ही इथे पुतळ्यांबरोबर फोटो देखील काढू शकता. हे बघताना वेळ कसा जातो ते कळतसुद्‍धा नाही. 


    तर एक अविस्मरनिय अनुभव घेण्यासाठी एकदा भेट जरुर द्या. हे संग्रहालय पहाण्यासाठी रु. ३००/- ची प्रवेशिका आहे, प्रवेशिका तुम्ही ऑनलाईन त्यांच्या संकेथस्तळावरुनही घेऊ (नोंदवू) शकता.

 

    या रेड कार्पेट मेणाच्या पुतळ्यांचा संग्रहालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे : रेड कार्पेट वॅक्स म्युझियम, आर सिटी मॉल, पहिला मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, अमृत नगर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई - ४०० ०८६.

 

    सदर माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून संकलित केलेली आहे.

  

कसे जायचे : जवळील रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेवरील घाटकोपर हे आहे. घाटकोपर पश्चिमेस येऊन तुम्ही रिक्षा किंवा ३८६/३८७ क्रमांकाच्या बसने जाऊ शकता. घाटकोपर रेल्वे स्थानक पश्चिम येथून २.२ कि. मी. अंतरावर असलेल्या आर सिटी मॉलला चालत जायचे झाल्यास साधारण ३० मिनिटे लागतील.

 

कधी जायचे : वर्षाचे बारा महिने कधीही सकाळी ९.४५ ते रात्रौ ९.३० वाजेपर्यंत.

 

तालुका : घाटकोपर

 

जिल्हा : मुंबई

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद तुम्ही दिलेल्या अमुल्य प्रतिसादाने अजून नवीन नवीन ठिकाणांसंबंधी माहिती संकलनास प्रोत्साहन मिळते. आपले मन:पुर्वक धन्यवाद राहुलजी

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, Please let me know

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple