चौल रेवदंडा - Chaul Revdanda
आज आपण पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्याविषयी माहिती घेऊया. तर कुंडलिका नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम होतो असे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालूक्यातील रेवदंडा गाव. या रेवदंडा गावातून जंजिर्याच्या सिद्धीच्या आणि मुंबईकर इंग्रजाच्या सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगिज कॅप्टन सोज याने १५२८ साली किल्ला बांधावयास सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी १५२१ ते १५२४ सालादरम्यान रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून घेतली. या रेवदंडा गडावर तीन राज्यकर्त्यांनी राज्य केले एक अर्थातच पोर्तुगिज दुसरे मराठे आणि तिसरे इंग्रज. तर हा झाला रेवदंडा किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच पोर्तुगिजांचे राजचिन्ह कोरलेले दिसते. हा किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडे असला तरी काही ठिकाणी किल्ल्यावर खाजगी मालकी हक्क असल्याचे समजून येते त्यामुळे संपूर्ण किल्ला पहावयास मिळत नाही. किल्ला आणि भोवतालची तटबंदी बर्याच ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत आहेत. किल्ला पाहून झाल्यानंतर पश्चिमेस असलेला नितांत सुंदर नारळी पोफळीच्या झाडांनी बहरलेल्या अशा निवांत समुदकिनार्याला भेट द