पोस्ट्स

वेलास समुद्रकिनारा, रत्‍नागिरी - Velas Beach, Ratnagiri

     ऑलिव्ह रिडली जातीच्या कासवांसाठी प्रसिध्द असलेले अंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील वेलास हे गाव आणि ह्या गावचा वेलास समुद्रकिनारा.       पूर्वेला डोंगराने वेढलेला आणि पश्चिमेला अथांग असा निळाशार समुद्र अशा निसर्गसौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा म्हणजे वेलास. वेलास गावचा इतिहास म्हणजे नाना फडणवीस यांचे हे जन्मगाव. एवढीच माहिती अनेकांना वेलास गावाबद्दल माहित असावी त्यामुळे दुर्लक्षीत असलेले हे गाव. पण हे गाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे ते ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या कासवांमुळे. या ऑलिव्ह रिडली प्रजातीची कासवे त्यांच्या विणीच्या (प्रजनन काळ) हंगामात या वेलासच्या सुरक्षित समुद्रकिनारी त्यांची असंख्य अंडी देतात व मार्च अखेरपर्यंत त्या अंड्‍यातून निघणारी पिल्ले त्याच्या मुक्‍कामी म्हणजे समुद्रात परतात.         गावातील मंडळी या कासवांच्या अंड्‍यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतात. तसेच गावातीलच सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे स्वयंसेवक सकाळपासूनच समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकांना कासवांब...

रेड कार्पेट मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय - Red Carpet Wax Museum

     आज आपण मुंबईतील पहिले मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय जे घाटकोपर मधील आर. सिटी मॉल मध्ये वसलेले आहे त्यासंबंधी माहिती घेऊयात.       हे संग्रहालय जवळपास १००० चौरस फुट क्षेत्रात पसरलेले आहे. ते बनवताना साधारण ५ वर्षांचा अवधी लागला कारण त्यांना तिथे फक्‍त पुतळेच ठेवायचे नव्हते तर त्या पुतळ्यांबरोबरच त्या व्यक्‍तिमत्वाचा अभ्यास करुन त्या व्यक्‍तींनी केलेल्या कार्यांचा त्या पुतळ्यांभोवती वातावरण निर्मिती करायची होती म्हणून एकढा अवधी हे संग्रहालय बनवण्यास लागला. हे संग्रहालय डिसेंबर २०१६ साली सर्वांसाठी खुले केले.      येथे जगातील सर्वोत्कृष्ट असे समाजसेवक, राजकारणी, सिनेसृष्टीतील सिने तारे - तारका, क्रीडापटू, वैज्ञानिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचे मेणाचे पुतळे येथे आहेत, त्यात दलाई लामा, नेल्सन मंडेला, मायकल जॅक्शन, बराक ओबामा, मदर तेरेसा, अब्राहिम लिन्कन, अण्णा हजारे, सायना नेहवाल, मेसी अजून असे जवळपास ४० व्यक्‍तींचे मेणाचे पुतळे आहेत, त्यांच्याबद्‍दलची माहितीही येथे तुम्हाला दिली जाते. त्याशिवाय तुम्ही इथे पुतळ्यांबरोबर फोटो देखील काढ...

गिल्बर्ट टेकडी (हिल) - Gilbert Hill

      आज आपण मुंबईस्थीत एका दुर्लक्षित जागतिक वारसाबद्दल माहिती घेऊयात.      मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेली ही जागतिक वारसा लाभलेली वास्तु म्हणजे गिल्बर्ट टेकडी (हिल). सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मेझोझिक कालखंडात पृथ्वीच्या गर्भातून झालेल्या ज्वालामुखीच्या लावारसातून त्याकाळी ५६ एकर पसरलेली आणि २०० फुट उंच तयार झालेली स्तंभरुपी कडा असलेली टेकडी म्हणजेच गिल्बर्ड टेकडी (हिल). अशाप्रकारच्या स्तंभरुपी कडा असलेल्या आश्चर्यकारक आणि भौगोलिक दृष्ट्‍या दुर्मिळ असलेल्या टेकड्‍या किंवा डोंगर हे जगात फक्‍त तीनच ठिकाणी आहेत त्यातली एक आपल्या भारतातील महाराष्ट्रात असलेल्या मुंबईतील अंधेरी  पश्चिम  येथील गिल्बर्ट टेकडी (हिल). दुसरे अशाच पद्धतीने तयार झालेल्यांपैकी एक आहे वायोमिंगमधील डेविल्‍स टॉवर आणि दुसरे पूर्व कॅलिफोर्निया अमेरिका येथील डेव्हिल्स पोस्टपाईल अशी ही अद्‍भुत निसर्गाचा अविस्कार असलेली ठिकाणे आहेत.      गिल्बर्ट टेकडी ही सुरुवातीस ५६ एकर परिसात पसरलेली ही टेकडी  सद्‍ध्या काही  लोकांनी अजानतेपणे केलेल्या खोदकामामुळे क...

महाराष्ट्र निसर्ग उद्यान - Maharashtra Nature Park

          महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे मुंबईच्या मध्यभागी असलेले मानव निर्मित जंगल आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाला पूर्वी माहिम निसर्ग उद्यान म्हणूनही ओळखले जात असे. या ठिकाणी पूर्वी म्हणजे ऐंशी - नवदीच्या दशकात येथे मोठे कचरा संचयनाचे आणि त्याची योग्यती व्यवस्था करण्याचे ( Garbage Dumping Ground)  ठिकाण होते. अथक प्रयत्‍नाने धारावी या ठिकाणी मिठी नदीच्या खारफुटीच्या जंगलाला लागूनच हे महाराष्ट्र निसर्ग उद्यान वसवलेले आहे.        जेष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या उपस्थितीत आंबा, पिंपळ, वड, उंबर आणि पळस ह्या स्थानिक पाच झाडांचे महाराष्ट्र निसर्ग उद्यानात वृक्षारोपण केले. मार्च १९९१ साली महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल आणि वनविभागाने महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि या उद्यानाला लागूनच असलेल्या मिठी नदीतील खारफुटीचे जंगल मिळून बनलेल्या जवळजवळ १८० हेक्टर क्षेत्राला "संरक्षित वन" म्हणून घोषित केले.       सुरुवातीला येथे पहिला फक्‍त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांनाच प्रवेश होता, कालांतराने मग सामान्य जनमाणसांत निसर्गाप्र...

थिबा राजवाडा - Thiba Palace

     इ. स. १८८५ सालापासून रत्‍नागिरी आणि ब्रम्हदेश म्हणजे सद्ध्याचा म्यानमार देशाबरोबर भावनिक नाते जुळलेले आहे ते थिबा राजामुळे.      १८८५ साली ब्रिटिशांनी ब्रम्हदेशावर कब्जा करत सात वर्षे राज्य करणार्‍या थिबा राजा आणि परिवाराला बंदी केले. ब्रम्हदेशावर राज्य करणारा शेवटचा राजा म्हणजेच राजा थिबा. राजाने पुन्हा उठाव करु नये म्हणून बंदी केलेल्या राज परिवाराला तत्कालिन मद्रास मार्गे रत्‍नागिरीला आणले व येथे स्थानबध्द केले. पण राज परिवाराला जेथे उतरवण्यात आले होते तेथे राज परिवाराला साजेशा सुविधा पुरविता येत नव्हत्या म्हणून १९१० साली सुमारे २७ एकराच्या प्रशस्थ जागेवर सर्व सोयींनी सुसज्‍ज असा तीन मजली राजवाडा बांधला. आणि थिबा राजाच्या राजपरिवाराला मग या राजवाड्‍यात नजरकैद करून ठेवले. थिबा राजाचा आपल्या मायभूमी, प्रजेपासून दूर जवळ जवळ ३० वर्षाच्या नजरकैदेत वयाच्या ५८ व्या वर्षी १९१९ साली मृत्यू झाला. अशा या राजाच्या या राजवाड्‍यातील वास्तव्यामूळे हा राजवाडा "थिबा राजवाडा" म्हणून प्रसिध्द झाला.        राजाला वेगवेगळ्या कलांचे शौक असल्यामुळे राजव...

चौल रेवदंडा - Chaul Revdanda

     आज आपण पोर्तुगिजांनी बांधलेल्या किल्ल्याविषयी माहिती घेऊया. तर कुंडलिका नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम होतो असे ठिकाण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालूक्यातील रेवदंडा गाव. या रेवदंडा गावातून जंजिर्‍याच्या सिद्धीच्या आणि मुंबईकर इंग्रजाच्या सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगिज कॅप्टन सोज याने १५२८ साली किल्ला बांधावयास सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी १५२१ ते १५२४ सालादरम्यान रेवदंडा गावाभोवती तटबंदी बांधून घेतली. या रेवदंडा गडावर तीन राज्यकर्त्यांनी राज्य केले एक अर्थातच पोर्तुगिज दुसरे मराठे आणि तिसरे इंग्रज. तर हा झाला रेवदंडा किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास.        किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच पोर्तुगिजांचे राजचिन्ह कोरलेले दिसते. हा किल्ला संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडे असला तरी काही ठिकाणी किल्ल्यावर खाजगी मालकी हक्‍क असल्याचे समजून येते त्यामुळे संपूर्ण किल्ला पहावयास मिळत नाही. किल्ला आणि भोवतालची तटबंदी बर्‍याच ठिकाणी ढासळलेल्या अवस्थेत आहेत.        किल्ला पाहून झाल्यानंतर पश्चिमेस असलेला नितांत सुंदर नारळी पोफळीच...

अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा - Alibag Geo-magnetic Observatory

     आपल्या भारत देशातले हवामान जसे आहे तसे इतर देशांमध्ये क्वचितच  बघायला  आणि अनुभवायला मिळतील. आपल्या देशात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आढळतात. इतर देशांमध्ये शक्यतो हिवाळा आणि उन्हाळा हेच ऋतू आढळातात आणि क्वचितच पाऊस पडतो. आपल्या भारत देशातील शेती प्रामुख्याने पावसावर आणि लहरी हवामानावर खूप अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अभ्यास असणे खूप आवश्यक होते. सतरा अठराव्या शतकाच्या दरम्यान पार्‍याच्या तापमापक (थर्मामीटर/ Thermometer)  आणि वायुभारमापक (बरोमीटर/ Barometer)  यांचा शोध लागला होता. या दोन यंत्रांमुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याची शक्यता खूप वाढली होती म्हणून ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने या तंत्रज्ञानाचा वापर करुन हवामानाचा आधुनिक अभ्यास करण्यासाठी १८२३ साली मुंबईच्या कुलाबा येथे वेधशाळा उभारली व ती पुढे कुलाबा वेधशाळा म्हणून ओळखू लागली. येथे सुरुवातीला हवामान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करत त्यांच्या नोदी करत असत. १८४० साली येथे चुंबकाकर्षकमापन ( Magneto Meter)  यंत्रे बसविण्यात आली. तेव्हापासून येथे पृथ्वीवरील चुंबकीय लह...