पोस्ट्स

वंडर्स पार्क - Wonders Park

     वंडर्स पार्क हे नवी मुंबईतील एक अविस्मरणीय आनंद देणारे उद्यान आहे. हे उद्यान साधारणतः ३० एकर जागेवर वसवलेले आहे. या पार्कमध्ये जाण्यासाठी किमान प्रवेश शुल्क आकारले जाते.        वंडर्स पार्कमध्ये प्रवेश केल्याकेल्या एका उंचावलेल्या हातातील क्युब आपले लक्ष वेधून घेते आणि आपला एका छान दिवसाला सुरुवात होते. या पार्कमध्ये विविध आकाराचे प्रकाराचे बाक आणि विविध झाडांनी सुसज्ज अशी बाग आहे ज्यात मुले निवांतपणे खेळू शकतात. तसेच मुलांना खेळण्यासाठी येथे घसगुंडीचे विविध प्रकार तसेच झोपाळे, इतर साहसी खेळ देखील आहेत तेथे पडल्यावर मुलांना इजा होऊ नये म्हणून खाली रबराच्या मॅटची फ्लोरिंग केलेली आहे. इतर जॉय राईड्स, संपूर्ण वंडर पार्कला फेरी मारणारी टॉय ट्रेन देखील आहेत, त्यांची प्रवेशिका मुख्य प्रवेशिका घेतानाच घेणे बंधनकारक आहे, कारण पार्कमध्ये तशी सुविधा नाही आहे.        या वंडर्स पार्कचे मुख्य आकर्षण यात आग्रा येथील ताजमहाल, चीनची प्रसिद्ध ग्रेट वॉल, रिओ दि जानेरो येथील क्रिस्टो रेडेन्टर, जॉर्डन येथील पेट्रा - अल खजनेह, पेरू येथील माचू पिचू,...

जुहू गार्डन - Juhu Garden

     जुहू गार्डन म्हटले की सर्वांना लहानपणाची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. कारण त्याकाळी मुंबईत गार्डनही मोचकीच होती त्यात या गार्डनमध्ये असलेल्या एका विशिष्ट कारणामुळे हे गार्डन खुप प्रसिद्ध होते. आणि ते कारण म्हणजे या गार्डनमध्ये एक सिमेंटचे काँक्रिटचे बनवलेले विमान. हे गार्डन साधारणपणे ५० वर्षे जुने आहे. ते बृहन मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित येते. सध्या हे गार्डन लायन्स जुहू म्युनिसिपल पार्क या नावाने ओळखले जाते.       ज्याकाळात सामान्य व्यक्तीला विमान पाहणे आणि विमानात बसणे दुरापास्त होते त्याकाळात अबालवृद्धांचे विमानात बसण्याची हौस मौज पुरवणारे ठिकाण म्हणजेच हे जुहूचे गार्डन. तसे पाहिले तर जुहू समुद्र किनारी फिरायला जाणारे आवर्जून ह्या गार्डनला भेट देतात.       तर हे विमान १९६० च्या दशकात एअर इंडिया या विमान सेवा पुरवणार्‍या कंपनीने बोईंग ७०७-४३६ या बनावटीच्या विमानाची सिमेंट काँक्रिटचे प्रतिरुप या गार्डनसाठी मुंबई महानगर पालिकेला भेट दिली आहे असे कळते. मध्यंतरी या विमानाचे काही अवशेष कोसळल्यामुळे अपघात झाला होता त्यामुळे ...

गांधारपाले लेणी, महाड - Gandharpale Caves, Mahad

   मुंबई गोवा मार्गावरील प्राचीन काळापासून एक महत्वाचे व्यापारी ठिकाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्यामुळे प्रसिद्ध असलेले महाड. महाड परिसरात येताच बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात लांबून दिसणारी लेणी आपल्याला खुणावत असते तीच गांधारपाले बौद्ध लेणी.       तर मग आज आपण या गांधारपाले बौद्ध लेण्याविषयी माहिती जाणून घेऊ या.       या परिसरातून गांधारी नदी वाहते, व लेण्याजवळ असलेल्या शिलालेखानुसार या प्रांतावर इ. स. १३० च्या दरम्यान बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांचे राज्य होते असे समजते, या पुलित राजाच्या नावावरूनच पुढे या गावाचे नाव पाले झाले असावे, कालांतराने गांधार नदी जवळील प्रदेश असल्यामुळे पाले हे गाव गांधारपाले या नावाने ओळखले जाऊ लागले. तर राजा विष्णु पुलित यांच्या कालखंडात ही तीन मजली बौद्ध लेणी २८-३० छोट्‍या मोठ्‍या लेण्यांच्या समुहात हीनयान पद्धतीने कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये ३ बौद्ध स्तुप, साधारण १५ पाण्याची टाकं आणि ब्राम्ही भाषेतील ३ शिलालेख आहेत.       त्यात...

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

     भारतात जागोजागी डोंगरात कोरलेल्या लेण्या दिसतात. त्यापैकी एक खेड रत्नागिरी मध्ये असलेल्या बौद्ध लेणीसंबंधी आज आपण माहिती घेऊया.        रत्नागिरीचे खेड एक गजबजलेले ठिकाण आहे. तर याच गजबजलेल्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर एक बौद्ध लेणी आहे. ही लेणी खेडची बौद्धलेणी म्हणूनच प्रसिद्ध आहे.        या लेणीमध्ये एक चैत्य विहार आहे तसेच भिखुंना साधना करण्यासाठी तसेच राहण्यासाठी तीन खोल्याही आहेत. कालांतराने खेड ते दापोली, हर्णे बंदर हा व्यापारी मार्ग असल्यामुळे येथे व्यापारीवर्ग तसेच प्रवासी आराम करण्यासाठीसुद्धा या लेणीचा वापर करत असावेत.        ही लेणी जास्तकाळ दुर्लक्षित राहील्यामुळे लेणीची सविस्तर माहिती मिळणे अवघड आहे.        परिसरात कोणताही कचरा तसेच कोणत्याही प्रकारचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या व आपला अमुल्य वेळ आनंदी करावा.        सदर माहिती ही इंटरनेटच्या माध्यमातून संकलित केलेली आहे.        वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमें...

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple

इमेज
  छायाचित्र सौजन्य : श्री. व सौ. चित्रा योगेंद्र धोत्रे      तांबडी सुर्ला येथील हे महादेवाचे मंदिर कदंब शैलीतील १२ व्या शतकातील आहे. साधारण इ. स. १० ते १३ व्या शतकात गोव्यामध्ये कदंब राजवट होती. आज फारच कमी ठिकाणी कदंब स्थपत्य शैलीतील वास्तू दिसतात, त्यापैकी हे गोव्यातील महादेवाचे एक प्रचीन मंदिर आहे.        हे नितांत सुंदर मंदिर गोवा कर्नाटक राज्यांना जोडणार्‍या अंबोड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मोलेम अभयारण्यात वसलेले आहे. त्यामुळे या मंदिराकडे जाणारा मार्ग मस्त हिरव्यागार झाडांनी आच्छादलेला असल्यामुळे हा प्रवास आल्हाददायक वाटतो.        हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर बेसॉल्टच्या दगडांनी बनवलेले आहे. प्रथम दर्शनी मंदिर बघतानाच आपल्याला या मंदिरावर केलेल्या कलाकुसरीची भुरळ पडते. मंदिरात प्रवेश करताना मंदिराच्या कठड्‍यावरील नक्षीकाम बघतच मंदिराच्या तीन द्वार असलेल्या सभामंडपात नकळत प्रवेश होतो. सभामंडपात भग्नावस्थेतील नंदी दिसतो, व सुबक कलाकुसर केलेले त्रिस्तरीय दगडी खांब आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराचे छत अष्टकोणी कमळ...

शिवनेरी किल्ला - Shivneri Fort

     आज आपण जगप्रसिद्ध अशा शिवनेरी किल्ल्याबद्दल महिती घेणार आहोत. कारणही आज तसेच आहे ना आज दिनांक १९ फेब्रुवारी, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि शिवनेरी किल्ला हे त्यांचे जन्मस्थळ तर आहेच पण तमाम शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान देखील आहे.        तर असा हा शिवनेरी किल्ला १२ व्या शतकापासून डौलात उभा आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यात आहे. जुन्नर किंवा जुन्नेर हे जीर्णनगर म्हणून इसवीसनापूर्वीपासून प्रसिद्ध आहे. जुन्नर हे नाणेघाट डोंगररांगात वसलेले एक प्रचलित शहर होते. तसेच नाणेघाटातून फार मोठ्या प्रमणात व्यापारी वाहतूक चालत असे. त्यामुळे या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मीती करण्यात आली त्यापैकीच एक शिवनेरी दुर्ग. कालांतराने येथे यादवांचे राज्य आले याच दरम्यान शिवनेरी दुर्गाला गडाचे स्वरूप आले. या शिवनेरी गडाने शकराजांपासून ते अगदी ब्रिटिश सांम्राज्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली पण सर्वात जास्त शिवनेरी किल्ला हा येथे झालेल्या बाल शिवाजी यांच्या जन्मस्थळामुळे जगप्रसिद्ध झा...

वेलास समुद्रकिनारा, रत्‍नागिरी - Velas Beach, Ratnagiri

     ऑलिव्ह रिडली जातीच्या कासवांसाठी प्रसिध्द असलेले अंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील वेलास हे गाव आणि ह्या गावचा वेलास समुद्रकिनारा.       पूर्वेला डोंगराने वेढलेला आणि पश्चिमेला अथांग असा निळाशार समुद्र अशा निसर्गसौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा म्हणजे वेलास. वेलास गावचा इतिहास म्हणजे नाना फडणवीस यांचे हे जन्मगाव. एवढीच माहिती अनेकांना वेलास गावाबद्दल माहित असावी त्यामुळे दुर्लक्षीत असलेले हे गाव. पण हे गाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे ते ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या कासवांमुळे. या ऑलिव्ह रिडली प्रजातीची कासवे त्यांच्या विणीच्या (प्रजनन काळ) हंगामात या वेलासच्या सुरक्षित समुद्रकिनारी त्यांची असंख्य अंडी देतात व मार्च अखेरपर्यंत त्या अंड्‍यातून निघणारी पिल्ले त्याच्या मुक्‍कामी म्हणजे समुद्रात परतात.         गावातील मंडळी या कासवांच्या अंड्‍यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतात. तसेच गावातीलच सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे स्वयंसेवक सकाळपासूनच समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकांना कासवांब...