वंडर्स पार्क - Wonders Park

    वंडर्स पार्क हे नवी मुंबईतील एक अविस्मरणीय आनंद देणारे उद्यान आहे. हे उद्यान साधारणतः ३० एकर जागेवर वसवलेले आहे. या पार्कमध्ये जाण्यासाठी किमान प्रवेश शुल्क आकारले जाते.

 

    वंडर्स पार्कमध्ये प्रवेश केल्याकेल्या एका उंचावलेल्या हातातील क्युब आपले लक्ष वेधून घेते आणि आपला एका छान दिवसाला सुरुवात होते. या पार्कमध्ये विविध आकाराचे प्रकाराचे बाक आणि विविध झाडांनी सुसज्ज अशी बाग आहे ज्यात मुले निवांतपणे खेळू शकतात. तसेच मुलांना खेळण्यासाठी येथे घसगुंडीचे विविध प्रकार तसेच झोपाळे, इतर साहसी खेळ देखील आहेत तेथे पडल्यावर मुलांना इजा होऊ नये म्हणून खाली रबराच्या मॅटची फ्लोरिंग केलेली आहे. इतर जॉय राईड्स, संपूर्ण वंडर पार्कला फेरी मारणारी टॉय ट्रेन देखील आहेत, त्यांची प्रवेशिका मुख्य प्रवेशिका घेतानाच घेणे बंधनकारक आहे, कारण पार्कमध्ये तशी सुविधा नाही आहे.

 

    या वंडर्स पार्कचे मुख्य आकर्षण यात आग्रा येथील ताजमहाल, चीनची प्रसिद्ध ग्रेट वॉल, रिओ दि जानेरो येथील क्रिस्टो रेडेन्टर, जॉर्डन येथील पेट्रा - अल खजनेह, पेरू येथील माचू पिचू, मॅक्सिको येथील चिचेन इझा आणि इटलीतील कोलोशियम ही जगातील सात आश्चर्यांची प्रतिरुपे येथे आहेत.

 

    अजूनही बरीच प्रेक्षणिय स्थळे येथे फिरावयास आहेत. या वंडर्स पार्कमध्ये १००० लोक आरामात बसू शकतील असे एक सुसज्ज एम्फि थिएटर (खुला रंगमंच) आहे तेथे लोक आपली कला सादर करु शकतात. येथे जॉगिंग, सायकलिंग ट्रॅक देखील आहेत. तसेच अजून एक आश्चर्यकारक खेळ आहे ज्यात २ ते ३ फुटाच्या आकाराच्या सोंगट्यांनी आपल्याला शतरंज अर्थात चेस खेळता येते. तसेच परिसरात ठिक ठिकाणी तलाव, पाण्याची डबकी, कारंजे आणि त्यात विहार करणारे पक्षी, बदके यात आपले मन रमून जाते. या पार्कमध्ये बर्‍याच कलाकृती, शिल्पकला आपल्याला पहावयास मिळतात.

 

   फिरता फिरता भूक लागली तर ती शमवण्यासाठी येथे एक उपहारगृह देखील आहे जे वाजवी किंमतीत खाद्यपदार्थ पुरवतात.

 

    या वंडर्स पार्कमध्ये आल्यावर वेळ कसा जातो ते कळणारसुद्धा नाही.

 

   येथे फोटोग्राफर्ससाठी फोटोशुटसाठी हे वंडर्स पार्क उत्तम पर्याय आहे. तर अशा या विविधतेने नटलेल्या नवी मुंबाईतील अद्भुत वंडर्स पार्कला आवर्जून भेट द्या. प्रवेशिकांसंबंधी दर तालिका वंडर्स पार्कच्या प्रवेशद्वाराजवळच लावलेली आहे त्यामुळे तिथे आपणास सुधारित दर तालिकेप्रमाणे रक्‍कम भरून प्रवेशिका घेऊ शकता.

 

 

विशेष सुचना : या वंडर्स पार्कचा परिसर अत्यंत स्वच्छ आहे त्यामुळे परिसरात आपल्यामुळे कचरा होणार नाही याची काळजी घ्या.

 

    वरील माहिती कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून जरुर कळवा. माहिती आवडल्यास सामायिक (शेअर) करा आणि सभासद व्हा (सबस्क्राईब करा).

 

जवळील ठिकाणे : नेरुळ येथील रॉक गार्डन, सी-वूड पश्चिमेला असलेले ज्वेल्स ऑफ नवी मुंबई

 

कधी जायचे : शक्यतो पावसाळ्यात जाणे टाळावे. वेळ सकाळी ६.०० ते मध्यान १२.०० वाजेपर्यंत व दुपारी ३.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत.

 

कसे जायचे : जर रेल्वे प्रवास करायचा असल्यास मुंबई, ठाण्यावरून पनवेलला जाणारी हर्बर मार्गावरील ट्रेन पकडून सी-वूड स्थानकात उतरून पश्चिमेकडून रिक्षा करून जाता येते. तसेच बस मार्गे जायचे झाल्यास मुंबई, बोरिवली, ठाणे मार्गे उरणला जाणार्‍या एस. टी. ने प्रवास करून वंडर्स पार्क येथे उतरता येते. अन्यथा बी. इ. एस. टी ची बस ने नेरुळच्या एल. पी. बस स्टॉपला उतरून रिक्षाने जाता येथे. शिवाय तेथे पार्किंगची सुविधा असल्यामुळे तुम्ही खाजगी गाडीनेही जाऊ शकता.

 

तालुका : नेरुळ (सी-वुड)

 

जिल्हा : नवी मुंबई

 

राज्य : महाराष्ट्र

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, Please let me know

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रत्नागिरी खेडची बौद्ध लेणी - Buddhist Caves in Khed, Ratnagiri

नॅशनल पार्क (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) - National Park (Sanjay Gandhi National Park)

तांबडी सुर्ला - महादेव मंदिर, गोव - Tambdi Surla - Lord Mahadev Temple