बारवी धरण अंबरनाथ/बदलापूर - Barvi Dam (Ambarnath/Badlapur)
पाऊस पडायला लागला की सर्वांना मस्त पाण्यात डुंबायला, भिजायला आवडते. मग सुरु होते पावसाळी सहलीची लगबग, कुठे जायचे कसे जायचे याची चर्चा. म्हणुनच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मुंबईजवळील बारवी नदीवर बांधलेल्या बारवी धरणाच्या परिसराची माहिती. तर बारवी धरणाला भेट देण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहेत ती मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानके. त्यामुळे लोकल ने जायचे झाल्यास सकाळी लवकरच प्रवास केलेला बरा. नाहीतर स्वत:चे वाहन असल्यास सकाळी लवकर रस्तेमार्गे जाणे योग्य कारण उशीरा निघाल्यास रस्तेमार्गे जाताना वाहतुकीत वेळेचा खोळंबा होण्याची शक्यता असते. अंबरनाथ किंवा बदलापूरवरून बारवी धरणाकडे दोन्ही बाजूने हिरवीगार झाडीतून जाणारा नागमोडी रस्ता पार करीत जेव्हा धरणाजवळ पोहोचतो त्यावेळी बारवी धरणाचा काठोकाठ भरलेला जलाशय आणि तिथले नयनरम्य निसर्ग पाहिल्यावर प्रवासात जाणवलेला थकवा कुठल्याकुठे पळून जाईल व एकदम मोकळ्या हवेत ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल. हा परिसर जंगलाने वेठलेला असल्यामुळे रस्त्याने येताना काही जंगली पशुपक्षी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका व घाबरुन त्यांना कोणती ई