वेलास समुद्रकिनारा, रत्नागिरी - Velas Beach, Ratnagiri
ऑलिव्ह रिडली जातीच्या कासवांसाठी प्रसिध्द असलेले अंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वेलास हे गाव आणि ह्या गावचा वेलास समुद्रकिनारा. पूर्वेला डोंगराने वेढलेला आणि पश्चिमेला अथांग असा निळाशार समुद्र अशा निसर्गसौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा म्हणजे वेलास. वेलास गावचा इतिहास म्हणजे नाना फडणवीस यांचे हे जन्मगाव. एवढीच माहिती अनेकांना वेलास गावाबद्दल माहित असावी त्यामुळे दुर्लक्षीत असलेले हे गाव. पण हे गाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाऊ लागले आहे ते ऑलिव्ह रिडली प्रजातीच्या कासवांमुळे. या ऑलिव्ह रिडली प्रजातीची कासवे त्यांच्या विणीच्या (प्रजनन काळ) हंगामात या वेलासच्या सुरक्षित समुद्रकिनारी त्यांची असंख्य अंडी देतात व मार्च अखेरपर्यंत त्या अंड्यातून निघणारी पिल्ले त्याच्या मुक्कामी म्हणजे समुद्रात परतात. गावातील मंडळी या कासवांच्या अंड्यांचे चांगल्याप्रकारे संगोपन करतात. तसेच गावातीलच सह्याद्री निसर्ग मित्र संघटनेचे स्वयंसेवक सकाळपासूनच समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकांना कासवांबाबतीत योग्यते मार्गदर्शन करतात. येथे कासवांची अंडी नैस