पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बारवी धरण अंबरनाथ/बदलापूर - Barvi Dam (Ambarnath/Badlapur)

     पाऊस पडायला लागला की सर्वांना मस्त पाण्यात डुंबायला, भिजायला आवडते. मग सुरु होते पावसाळी सहलीची लगबग, कुठे जायचे कसे जायचे याची चर्चा. म्हणुनच आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मुंबईजवळील बारवी नदीवर बांधलेल्या बारवी धरणाच्या परिसराची माहिती.      तर बारवी धरणाला भेट देण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहेत ती मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानके. त्यामुळे लोकल ने जायचे झाल्यास सकाळी लवकरच प्रवास केलेला बरा. नाहीतर स्वत:चे वाहन असल्यास सकाळी लवकर रस्तेमार्गे जाणे योग्य कारण उशीरा निघाल्यास रस्तेमार्गे जाताना वाहतुकीत वेळेचा खोळंबा होण्याची शक्यता असते.      अंबरनाथ किंवा बदलापूरवरून बारवी धरणाकडे दोन्ही बाजूने हिरवीगार झाडीतून जाणारा नागमोडी रस्ता पार करीत जेव्हा धरणाजवळ पोहोचतो त्यावेळी बारवी धरणाचा काठोकाठ भरलेला जलाशय आणि तिथले नयनरम्य निसर्ग पाहिल्यावर प्रवासात जाणवलेला थकवा कुठल्याकुठे पळून जाईल व एकदम मोकळ्या हवेत ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल.      हा परिसर जंगलाने वेठलेला असल्यामुळे रस्त्याने येताना काही जंगली पशुपक्षी दिसल्यास आश्चर्य वाटू देऊ नका व घाबरुन त्यांना कोणती ई

Nivant - Journey Towards Relaxation

इमेज
                  प्रिय  वाचकांस  असे  नमुद करावयाचे  आहे की.  मी  सुदेश  रा.  धोत्रे भ्रमंती कट्टाचा  सर्वोसर्वा. माझे  स्वत:चे   एक  नवीन  ध्यानधारणा  करण्यासाठी   (Meditation)   तसेच  तणावमुक्त   (Stress  Relief)   राहण्यासाठी    Nivant - Journey Towards Relaxation  हे सांगितीक युट्युब चॅनल सुरु केले आहे. तरी आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला अवश्य भेट द्या व सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारास शेअर करा.        जेणेकरुन माझे मनोबल वाढण्यास मदत होईल व मला न नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चॅनलला भेट देण्यासाठी पुढील युट्युबच्या चिन्हावर   क्लिक करा. धन्यवाद...

सज्जनगड (सातारा) - Sajjangadh (Satara)

        सज्जनगड  म्हटले  की  सर्वप्रथम  डोळ्यासमोर  येतात  ते  समर्थ  रामदास  स्वामी.  कारणही  तसे  आहे  म्हणा, निजामाकडून मराठ्‍यांनी हा जिंकून घेतला व  शिवाजी  महाराजांनी   * (यावेळी  शिवाजी  महाराजांचा  राज्याभिषेक झाल्या  नसल्याकारणाने  येथे  शिवाजी  महाराज  असा  उल्लेख  केला  आहे.)  समर्थ  रामदास   स्वामींना   गडावर कायमच्या  वास्तव्यासाठी  विनंती  केल्यामुळे  ते  कायमचे  वास्तव्यास  आले  व  या  गडाचे  नाव  नौरससातारा  चे सज्जनगड असे झाले ते आजता गायत.        तर हा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडाची आज आपण माहिती घेणार आहोत.       सज्जनगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्‍यातील कारी, परळी, गजवाडी या गावांनी वेढलेला आहे. अती प्रचीनकाळी याठिकाणी आश्वलायन ॠषी वास्तव्यास होते म्हणून तेव्हा आश्वलायनगड असे म्हणत असत. येथे ११ शतकात शिलाहार राजा भोज यांनी किल्ल्याची उभारणी केली. साधारत: १३५८ ते १३७५ च्या दरम्यान चवथा बगमनी राजा महंमदशहा याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. कालांतराने वारसाहक्‍काने हा कि