वंडर्स पार्क - Wonders Park
वंडर्स पार्क हे नवी मुंबईतील एक अविस्मरणीय आनंद देणारे उद्यान आहे. हे उद्यान साधारणतः ३० एकर जागेवर वसवलेले आहे. या पार्कमध्ये जाण्यासाठी किमान प्रवेश शुल्क आकारले जाते. वंडर्स पार्कमध्ये प्रवेश केल्याकेल्या एका उंचावलेल्या हातातील क्युब आपले लक्ष वेधून घेते आणि आपला एका छान दिवसाला सुरुवात होते. या पार्कमध्ये विविध आकाराचे प्रकाराचे बाक आणि विविध झाडांनी सुसज्ज अशी बाग आहे ज्यात मुले निवांतपणे खेळू शकतात. तसेच मुलांना खेळण्यासाठी येथे घसगुंडीचे विविध प्रकार तसेच झोपाळे, इतर साहसी खेळ देखील आहेत तेथे पडल्यावर मुलांना इजा होऊ नये म्हणून खाली रबराच्या मॅटची फ्लोरिंग केलेली आहे. इतर जॉय राईड्स, संपूर्ण वंडर पार्कला फेरी मारणारी टॉय ट्रेन देखील आहेत, त्यांची प्रवेशिका मुख्य प्रवेशिका घेतानाच घेणे बंधनकारक आहे, कारण पार्कमध्ये तशी सुविधा नाही आहे. या वंडर्स पार्कचे मुख्य आकर्षण यात आग्रा येथील ताजमहाल, चीनची प्रसिद्ध ग्रेट वॉल, रिओ दि जानेरो येथील क्रिस्टो रेडेन्टर, जॉर्डन येथील पेट्रा - अल खजनेह, पेरू येथील माचू पिचू, मॅक्सिको येथील चिचेन इझा आणि इटलीतील कोलोशियम ही जगात