गांधारपाले लेणी, महाड - Gandharpale Caves, Mahad
मुंबई गोवा मार्गावरील प्राचीन काळापासून एक महत्वाचे व्यापारी ठिकाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्यामुळे प्रसिद्ध असलेले महाड. महाड परिसरात येताच बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात लांबून दिसणारी लेणी आपल्याला खुणावत असते तीच गांधारपाले बौद्ध लेणी. तर मग आज आपण या गांधारपाले बौद्ध लेण्याविषयी माहिती जाणून घेऊ या. या परिसरातून गांधारी नदी वाहते, व लेण्याजवळ असलेल्या शिलालेखानुसार या प्रांतावर इ. स. १३० च्या दरम्यान बौद्ध धर्मीय कंभोज वंशिय राजा विष्णु पुलित यांचे राज्य होते असे समजते, या पुलित राजाच्या नावावरूनच पुढे या गावाचे नाव पाले झाले असावे, कालांतराने गांधार नदी जवळील प्रदेश असल्यामुळे पाले हे गाव गांधारपाले या नावाने ओळखले जाऊ लागले. तर राजा विष्णु पुलित यांच्या कालखंडात ही तीन मजली बौद्ध लेणी २८-३० छोट्या मोठ्या लेण्यांच्या समुहात हीनयान पद्धतीने कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये ३ बौद्ध स्तुप, साधारण १५ पाण्याची टाकं आणि ब्राम्ही भाषेतील ३ शिलालेख आहेत. त्यातील मुख्य लेणी जी १ क्रमांकाने ओळखल्या जाणार्या लेणीच्या प्रथम द