शिवनेरी किल्ला - Shivneri Fort
आज आपण जगप्रसिद्ध अशा शिवनेरी किल्ल्याबद्दल महिती घेणार आहोत. कारणही आज तसेच आहे ना आज दिनांक १९ फेब्रुवारी, रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि शिवनेरी किल्ला हे त्यांचे जन्मस्थळ तर आहेच पण तमाम शिवभक्तांचे श्रद्धास्थान देखील आहे. तर असा हा शिवनेरी किल्ला १२ व्या शतकापासून डौलात उभा आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर किंवा जुन्नेर हे जीर्णनगर म्हणून इसवीसनापूर्वीपासून प्रसिद्ध आहे. जुन्नर हे नाणेघाट डोंगररांगात वसलेले एक प्रचलित शहर होते. तसेच नाणेघाटातून फार मोठ्या प्रमणात व्यापारी वाहतूक चालत असे. त्यामुळे या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मीती करण्यात आली त्यापैकीच एक शिवनेरी दुर्ग. कालांतराने येथे यादवांचे राज्य आले याच दरम्यान शिवनेरी दुर्गाला गडाचे स्वरूप आले. या शिवनेरी गडाने शकराजांपासून ते अगदी ब्रिटिश सांम्राज्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली पण सर्वात जास्त शिवनेरी किल्ला हा येथे झालेल्या बाल शिवाजी यांच्या जन्मस्थळामुळे जगप्रसिद्ध झाला. राजमाता जिजाऊ गरोदर असतान